धुळे : शहरात डेंग्यूच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी मनपातर्फे घरोघरी भेटी देऊन डेंग्यू अळीचा शोध घेण्यात येवून नागरिकांना जनजागृती केली जात आहे़ त्यामुळे हिवताप नियंत्रण मोहिमेव्दारे रूग्णांची संख्येत मोठी घट झाली आहे़पावसाळ्याच्या उंबरठ्यावर वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलं व ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत असल्याने साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दोन महिन्यापासुन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे़दूषित पाणी, शिळे अन्न, वातावरणातील गारठामुळे लहान मुलाांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढ होते़ पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी महापालिका आरोग्य व मलेरिया विभागातर्फे शहरात जनजागृती अभियानातून जनजागृती केली जात आहे़काळजी घेण्याचे आवाहनपाणी तुंबणाऱ्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेही आजारांमध्ये वाढ होत आहे. हिवताप, मलेरिया, टायफॉइड, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, असे आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. एक वषार्तील बाळांना रोटा व्हायरसमुळे डायरिया होण्याचा धोका असतो. त्यांची विशेष काळजी घ्यावी, मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कावीळ, टायफाइड, डायरिया या आजारांची साथ होती.लहान मुले आणि ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना साथीच्या आजारांची लागण लवकर होऊ शकते. त्यामुळे वातावरण बदलाच्या काळात मातांनी कटाक्षाने लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आरोग्य व मलेरिया विभागातर्फे करण्यात आले आहे़मुलांना शुद्ध पाणी द्या़पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध आजार उद्भवतात. मुलांना उकळलेले शंभर टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे. दहा मिनिटे पाणी उकळून शुद्ध करण्याची सोपी आणि शाश्वत पद्धत अवलंबवावी गरज आहे़आज रॅलीतुन प्रबोधनजागतिक मलेरिया दिनानिमित्त महापालिका आरोग्य व मलेरिया विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ हिवतापा विषयी माहिती, जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी सकाळी ८ वाजता हिवताप कार्यालयापासुन मोटार सायकल रॅलीला प्रारंभ होणार आहे़ ही रॅली विद्यावर्धीनी महाविद्यालय, सिंचन भवन, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मार्ग हिवताप कार्यालयात रॅलीचा समारोप होईल़
रूग्णांच्या संख्येत हिवताप नियंत्रण मोहिमेद्वारे घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:43 PM