लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेत हजर करून घेतले नाही म्हणून जिल्ह्यातील ४९ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ या महिन्याचे वेतन स्थगित केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.जिल्ह्यात ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहे. त्यांचे ५५ शाळांमध्ये आॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया झालेली आहे. अतिरिक्त शिक्षकांना समावून घ्यावे यासाठी शिक्षणाधिकाºयांनी ११ व १६ डिसेंबर २०१७ रोजी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी आतापर्यंत फक्त २४ शिक्षकांना आपल्या शाळेत समावून घेतलेले आहे. उर्वरित ६१ शिक्षकांना अजुनही शाळांमध्ये हजर करून घेतले नाही.या संदर्भात शिक्षणाधिकारी अहिरे यांनी दोनवेळा मुख्याध्यापक व संस्था चालकांची बैठक घेऊन, अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेतल्यास मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. दरम्यान मुदत उलटूनही मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ चे वेतन स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनीही अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेतल्यास त्यांच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे पदच व्यपगत करण्यात येईल असेही अहिरे यांनी सांगितले. दरम्यान मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केल्याने, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे एक महिन्याचे वेतन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:27 AM
शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची माहिती, अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास टाळाटाळ
ठळक मुद्देजिल्ह्यातील ८५ शिक्षक ठरले आहेत अतिरिक्तआतापर्यंत २४ शिक्षकांना शाळेत सामावून घेतले६१ शिक्षकांचा प्रश्न अजुनही कायम