लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील नरेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबियांना घरी येऊन चार जणांनी पिस्तूलचा धाक दाखविला़ परिणामी भयभीत झालेल्या पाटील यांनी आठवड्यानंतर दोंडाईचा पोलिस स्टेशनला तक्रार शुक्रवारी दिली आहे़विखरण देवाचे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी त्यांच्या जमिनीला योग्य मोबादला न मिळाल्याने मंत्रालयात जावून आत्महत्या केली होती़ त्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी जमिनीचे भूसंपादन करणाºया तत्कालिन अधिकाºयां विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सांगितले होते़ त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे़ पण, अद्याप यांबाबत गुन्हा दाखल झालेला नाही़ पाटील यांच्याकडे जमिनीचे पुरावे असल्यामुळे अचानक त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात गुंडांनी धमकी दिल्याने ते भयभीत झाले आहेत़ त्यांच्या घरी येऊन पाऊणचार घेऊन पिस्तूलचा धाक दाखविण्यात आला़ ही धमकी २० जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास देण्यात आली़ घाबरल्यामुळे शुक्रवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली़
पिस्तुलचा धाक दाखविल्याने पाटील कुटुंबियांना भरली धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:05 PM
घरी येऊन घेतला पाहुणचार : नरेंद्र पाटलांनी दिली पोलिसात तक्रार
ठळक मुद्देपाटील कुटुंबिय भयभीतदोंडाईचा पोलिसात तक्रार