धुळे : नियमित वेतनासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़ त्याचा परिणाम पाणी योजनावर झाला असल्याने त्या ठप्प आहेत़ राज्यभर हे आंदोलन सुरू असल्याने दैनंदिन पाणी योजनेच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे़ १ मार्च ते ४ मार्च २०१७ या चार दिवसांच्या कालावधीत कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज सांभाळले होते़ पण, शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाºयांनी आक्रमक होत ५ मार्च २०१७ पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला होता़ त्यानुसार ६ मार्चपासून काम बंद करत कार्यालयालगत कर्मचाºयांनी धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली़ मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता़ या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ सी़ निकम, एस़ बी़ पढ्यार, व्हीक़े़ सूर्यवंशी, एस़व्ही़ वाणी, पी़बी़ राठोड, यू़आऱ भोई अन्य कर्मचारी सहभागी झाले़१३६ कोटी पाणी योजनेचे काम सध्या या आंदोलनामुळे ठप्प झाले आहे़ या योजनेचा पहिला हप्तापैकी सुमारे ४३ कोटींचा निधी खर्च झाला आहे़ या कामाच्या पाठपुराव्यासह सुरू असलेले काम थांबविण्यात आलेले आहे़ याशिवाय, वलवाडी पाणी योजना आणि शिंदखेडा येथील पाणी योजनेचे कामसुद्धा थांबविण्यात आलेले आहे़ नियमित वेतन मिळायला हवे, अशी मागणी कायम आहे़ निवृत्तही सहभागीया आंदोलनात जिल्ह्यातून ७०, तर राज्यभरातून साडेसहा हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत़ विशेष म्हणजे या आंदोलनात राज्यभरातून ९ हजारावर कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़
काम बंदमुळे पाणी योजना झाल्या ठप्प
By admin | Published: March 07, 2017 11:18 PM