शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

धुळे महापालिकेत रंगांची उधळण, अधिकाºयांना डोलचीचा सपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:31 PM

सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकाºयांचा सहभाग : महिलांकडूनही धुळवड साजरी

ठळक मुद्दे-महापालिकेत होलिकोत्सव उत्साहात साजरा-सर्वपक्षीय नगरसेवक, राजकीय पदाधिकाºयांची धुळवड-अधिकाºयांना डोलचीने पाण्याचे सपके

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिकेत गुरूवारी होळी, धुलीवंदनाचा उत्साह दिसून आला़ सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येक अधिकाºयाच्या दालनात जाऊन त्यांच्यावर रंगांची उधळण केली़ तसेच डोलचीने पाण्याचे सपकेही मारले़ धुळे महापालिकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या दिवशीच धुलीवंदन साजरे करण्यास सुरूवात झाली़ सकाळी ११ वाजल्यापासून माजी आमदार प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, रविंद्र काकड, प्रशांत श्रीखंडे, नगरसेवक अमोल मासुळे, सदाशिव पाटील, सुनिल सोनार, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, भुपेंद्र लहामगे, चेतन मंडोरे, भरत खरात, विनोद जगताप, संदीप सुर्यवंशी, नंदलाल अजळकर, रविंद्र आघाव, धिरज चौधरी यांनी धुलीवंदन साजरे करण्यास सुरूवात केली़ प्रत्येक अधिकाºयाच्या दालनात जाऊन त्यांच्यावर रंग, पाणी उडविण्यात आले़ मुख्य लेखापरीक्षक राजू सोळूंके, उपायुक्त रविंद्र जाधव, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह कर्मचाºयांवरही रंगांची उधळण करण्यात आली़ ‘बुरा न मानो, होली है’ ़़  म्हणत महापालिकेच्या आवारात बादल्यांनी पाणी आणून एकमेकांना डोलचीने सपके मारण्यात आले़ तसेच स्पीकरवर होळीच्या गीतांवर सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी नृत्याचाही आनंद घेतला़ महापालिका आवारातून वाहनांवर जाणाºया नागरिकांवर देखील रंग उधळण्यात आले़  धुलीवंदनाच्या या उत्साहात मनपा कर्मचारी देखील सहभागी झाले होते़ त्यामुळे मनपात होळीचा चांगलाच उत्साह दिसून आला़ मनपात धुळवडीमुळे अधिकारी व कर्मचाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे अनेक विभाग ओस पडले होते़ आयुक्तही उपस्थित नसल्याचे दिसून आले़ दुपारनंतर तर सुटी असल्याचे सारखेच वातावरण होते़ विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकाºयांनी देखील धुळवड साजरी केली़ एकमेकांना रंग लावून होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या़