लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महात्मा गांधी यांनी पाहिलेले स्वप्न २ आॅक्टोबर २०१९ या त्यांच्या जयंतीच्या दिवशी साकारायचे आहे. त्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातील जनता जोपर्यंत स्वच्छतेला जीवनाचा अविभाज्य भाग समजत नाही. तोपर्यंत स्वच्छ भारत मिशन या संकल्पनेचीपूर्ती होणे शक्य नाही. जनतेने स्वच्छतेला प्राधान्य देऊन येणाºया काळात प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या या भाषणाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मंगळवारी दुपारी सुरू असताना निमंत्रित केलेले ग्रामसेवक, ग्रामसेविका व सरपंचांपैकी काहींनी चक्क डुलक्या मारल्या. तर काही जण भाषण सुरू असताना मोबाईलवर बोलत होते. काहींनी तर या कार्यक्रमाशी काहीही देणे घेणे नाही, असे समजत व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंगही केल्याचे चित्र येथे दिसून आले. बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह शताब्दी वर्षाचा समारोप मंगळवारी झाला. यानिमित्ताने तेथे ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्यातील धुळे व भुसावळ येथील काही स्वच्छतादूतांशीही पंतप्रधान संवाद साधणार होते. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, एकाही स्वच्छतादूताशी संपर्क न साधता पंतप्रधान मोदी यांनी भाषण आटोपल्यानंतर तत्काळ रवाना झाल्यामुळे पंतप्रधानाशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वच्छतादूतांचा हिरमोड झाला. देशातील साडे तीन लाख गावे हगणदरीमुक्त भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर गाव हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन हे अभियान राबविले. आजमितीस देशातील साडे तीन लाख गावे हगणदरीमुक्त झाली. ७ करोड वैयक्तीक शौचालये तयार केली. भाजपा सत्तेवर येण्यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मिर या राज्यांमध्ये स्वच्छतेचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी होती. या राज्यांचा विचार केला तर सत्याग्रह से स्वच्छाग्रह या उपक्रमांतर्गत या राज्यांमध्ये गेल्या आठ दिवसात २ लाखाहून अधिक शौचालयांचे कामे झाली. या राज्यात आता ८० टक्के कामे ही पूर्ण झाली असून लवकरच ही राज्यदेखील हगणदरीमुक्त होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे म्हटले. स्वच्छतेसाठी जनतेला प्रेरित करा गेल्या १०० वर्षापूर्वी महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी चंपारण्य येथे सत्याग्रह पुकारले. त्याचवेळी त्यांनी स्वच्छतेलाही प्राधान्य दिले होते. पैकी त्यांच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असून आता राहिले ते स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेबाबत जनतेला प्रेरित करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे, असेदेखील आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. स्वच्छतेचा कार्यक्रम हा कोणत्या सरकारचा नाही, पंतप्रधान कार्यालयाचा नाही किंवा शासकीय यंत्रणामार्फत राबविला जाणारा हा कार्यक्रम नसून तो प्रत्येकाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी या उपक्रमासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी येथे केले.
पंतप्रधानांच्या भाषणावेळी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अनेकांनी घेतल्या डुलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:14 PM
सत्याग्रह ते स्वच्छाग्रह उपक्रम : स्वच्छतेला जीवनाचा अविभाज्य भाग समजा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
ठळक मुद्दे१४ ते १८ एप्रिल यादरम्यान देशात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शासकीय यंत्रणेतर्फे घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबतचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी येथे केले. विविध योजनांचे उद्घाटन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय पेजयल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनीही मनोगत व्यक्त केले.