शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

धुळे येथे भरलेल्या विभागीय तंत्रनिकेतन प्रदर्शनात पेठची ई-सायकल प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:51 AM

पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २९ उपकरणे मांडली

ठळक मुद्देविभागीय तंत्रप्रदर्शनात २९ उपकरणे मांडलीविद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला दादअधिकाऱ्यांनी केली उपकरणांची पहाणी

आॅनलाइन लोकमतधुळे : विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रदूषण विरहित ई-सायकल...रूग्णवाहिका, अ‍ॅम्बुलन्स आदी वाहनांसाठी तयार केलेली अ‍ॅटोमॅटीक ट्रॅफीक सिग्नल यंत्रणा.. विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तू.. आदी उपकरणे मांडून विद्यार्थ्यांनी आपली कल्पना शक्तीचा प्रयत्य सर्वांना आणून दिला. विद्यार्थ्यांच्या या कल्पनाशक्तीला सर्वांनीच दाद दिली. दरम्यान नाशिक विभागीय तंत्रप्रदर्शनात पेठ (जि.नाशिक) येथील ई-सायकलला प्रथम क्रमांक मिळाला.निमित्त होते नाशिक विभागस्तरीय तंत्रप्रदर्शन २०१९चे. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकास व उद्योजकता विकास महाराष्टÑ राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई संचलित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षर कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्र प्रदर्शनात धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उपकरणे मांडली होती.या विभागीय तंत्रप्रदर्शनाचे उदघाटन महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक एस.आर. सूर्यवंशी होती. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही.एम. राजपूत, अनुराग मोराणकर, वर्षा कुळकर्णी, आर.डी. अहिरे, प्राचार्य एम.के.पाटील होते.विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनाचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला. निकाल असा-प्रथम क्रमांक- ई-सायकल (शासकीय आयटीआय, पेठ- सहभागी रूपाली खंबायत, विठोबा खैरनार, रवींद्र राऊतमाळे. द्वितीय क्रमांक विभागून- प्रथम कार व्हॅक्युम क्लिनर ( शासकीय आयटीआय नगर, सहभागी प्रदीप मिसाळ, विशाल सांबार, तुकाराम व्यवहारे), द्वितीय-मीनी बॉटल कुलर (शासकीय आयटीआय,धुळे, सहभागी-चंद्रकांत चौधरी, अजय पडळकर)तृतीय क्रमांक (विभागून)- चप्पल मेकिंग मशीन (शासकीय आयटीआय, जळगाव), इमरजन्सी ऐअर पंप (संगमनेर, सहभागी-अभिषेक शेळके, गणेश शेळके, शुभम देशमुख.अधिकाऱ्यांकडून पाहणीविद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांची एस.आर. सूर्यवंशी, सुधाकर देशमुख यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.परीक्षक म्हणून एस.एस. देसाई, आर.डी. अहिरे, गीता जोशी, अनुराग मोराणकर, अक्षय मित्तल यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Dhuleधुळे