धुळे : पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी मंगळवारी भल्या पहाटे तालुक्यातील दिवाणमळा, अनकवाडी व मुकटी परिसरात अचानक छापा टाकून अवैध डांबर कारखाने उध्वस्त केले. येथून दोन ट्रक पांढºया रंगाची पावडर, रिकामे ड्रम, एक टँकर, तीन मिक्सर मशीन आदी लाखोंचे साहित्य जप्त करण्यात आले़ याप्रकरणी ८ ते १० जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ दरम्यान, याच साहित्याच्या माध्यमातून डांबर बनवून ते काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा संशय पोलीस अधीक्षक यांना आहे़ जिल्ह्यात बºयाच ठिकाणी अवैध धंदे फोफावले आहेत़ परिणामी काही भ्रष्ट पोलिसांशी हातमिळवणी करुन अवैध धंदेवालक सध्या चांगलेच मालामाल होत आहेत़ यासंदर्भात तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती़ अशातच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पहाटे अचानक धाडसत्र अवलंबिले़ मोहाडी आणि तालुका पोलिसांच्या हद्दीत असलेल्या दिवाणमळा, मुकटी, अनकवाडी गावाजवळ धाड टाकून काळे डांबर बनविण्याचे कारखाने उध्वस्त केले़ दिवाणमळा परिसरात कारवाई करुन डांबर बनविण्याचे साहित्य, एक मिक्सर, मशीन जप्त करण्यात आले़ अनकवाडी गावाजवळील जंगलात एक टँकर, रिकामे ड्रम, दोन ट्रक पांढºया रंगाची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले़ मुकटी परिसरातही डांबर बनविण्याचा कारखाना आढळून आला आहे़ या तिनही ठिकाणाहून डांबर बनविण्याचे साहित्य आढळून आले असून तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे़ पहाटेच्या सुमारास पोलीस अधीक्षकांनी कारवाई करुन ८ ते १० जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे कंबरडे चांगलेच मोडले असून प्रभारी अधिकाºयांना देखील कारवाई करणे भाग पडले आहे़ अवैध धंद्यांच्या चालकांची आणि मालकांची माहिती मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे़
धुळ्यात भल्या पहाटे अवैध डांबर कारखाने उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 5:17 PM