लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्रात कोरोनामुक्तीचा नवा पॅटर्न निर्माण झाला आहे. जे. जे. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून मूळ नियुक्ती असलेल्या व सध्या धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉ.पल्लवी सापळे यांच्या रूपाने महाराष्ट्राला कोरोनमुक्तीचा नवा पॅटर्न मिळाला आहे. जेथे जेथे रुग्णांची संख्या वाढते त्याठिकाणी डॉ.सापळे यांना प्रतिनियुक्तीवर पाठवले जाते. त्यांनी आतापर्यंत मिरज, अहमदनगर, मालेगाव व धुळे येथील जबाबदारी सांभाळली आहे.२८ मार्च ते १९ एप्रिल पर्यंत डॉ. सापळे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे प्रतिनियुक्ती झाली होती. सांगली जिल्ह्यात एकाचवेळी २५ रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पुण्यानंतर सर्वाधिक रुग्ण सांगलीत होते. मिरज येथे कोवड व नॉन कोविड रुग्णालय वेगळे करण्याचा प्रयोग राबवला. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. १९ एप्रिल रोजी त्यांनी सांगली सोडले त्यावेळी सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.मालेगाव येथील खाजगी डॉक्टरांना प्रशिक्षण दिलेमालेगाव येथील वाढत असलेली रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली होती. धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी मालेगाव येथे भेट दिली. बाधितांच्या उपचारांसाठी तेथील खाजगी डॉटरांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेतली. तसेच धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू खाटांची संख्या वाढवली.जिल्हा रुग्णालयात सुरु केली पहिली आरटीपीसीआर लॅबसांगली येथून अहमदनगर येथे प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर त्यांनी नगर जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरु केली. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्या होत्या. मात्र जिल्हा रुग्णालयात सुरु झालेली राज्यातील ही पहिली आरटीपीसीआर लॅब होती. नगर जिल्ह्यातील विशिष्ट पट्ट्यात रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे संगमनेर येथे कोविड हॉस्पिटल व जामखेड येथे एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरु केले. २२ मे रोजी धुळे येथे प्रतिनियुक्तीवर येण्याआधी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती.
प्रभावी नियोजनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिष्ठता सापळे यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 7:59 PM