धुळे : शहरात कर्णबधिर व बहुविकलांग (डेफब्लाइंड) मुलांसाठी सेंटर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सांगितले.शहरातील रेसिडेन्सी पार्क येथे जिल्हा स्तरीय 'अँडव्होकेसी मीटिंग ऑन डेफब्लाइंडनेस अवेरनेस' हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन सेन्स इंटरनॅशनल इंडिया, रंगूनवाला फाउंडेशन ट्रस्ट व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्णबधिर व बहुविकलांग व्यक्ती, त्यांच्या समस्या व अधिकार याबाबत जाणीव व जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी मोहन देसले, महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, सर्व शिक्षण अभियानाचे प्रकल्प अधिकारी पी.टी. शिंदे, समन्वयक एस.एस. पिंगळे, बी.जे. बोरसे, नॅब इंडियाचे उपाध्यक्ष व डेफब्लाइंड प्रकल्पाचे चेअरमन अशोक बंग, सदस्य अजय कासोदेकर, प्रकल्प समन्वयक ज्योती आव्हाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या बंद शाळेत डेफब्लाइंड मुलांसाठी सेंटर सुरू करण्यासाठी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार ज्योती आव्हाड यांनी मानले.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न
By admin | Published: April 15, 2015 3:37 PM