शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

धुळ्यातील एकवीरादेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 5:01 PM

चैतन्य : ३० मार्चला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम; ३१ रोजी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक

ठळक मुद्देएकवीरादेवी यात्रोत्सवात हजारो भाविक मंदिर परिसरात येत असतात. अनेकदा भाविकांचे पैसे, सोन्याच्या वस्तू लांबविण्याच्या घटना घडत असतात.त्यापार्श्वभूमीवर मंदिराच्या चारही बाजुंना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.सद्य:स्थितीत मंदिरात १५ सीसीटीव्ही कॅमेरे असून यात्रोत्सवापर्यंत आणखी सात कॅमेरे बसविण्याचे नियोजन असल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास चैत्र पौर्णिमा अर्थात ३१ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांना आकर्षित करणारे पाळणे येण्यास सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवात ३० रोजी जाऊळाचा कार्यक्रम होणार असून यात्रोत्सवाच्या दिवशी सायंकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.  चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम गेल्या आवड्यात गुढी पाडव्यापासून एकवीरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला होता. तेव्हापासून श्रीराम नवमीपर्यंत एकवीरादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात  एकवीरादेवी मंदिरात दररोज भगवतीची पंचामृत महापूजा, सप्तशती पाठाचे वाचन, महानैवेद्य आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता. ३० मार्चला उतरणार जाऊळ एकवीरादेवी मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३० मार्चला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये; म्हणून मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे; याउद्देशाने मंदिराच्या मुख्य गाभाºयात तसेच मंदिराच्या पूर्र्वेकडच्या भागात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.  

एकवीरादेवी मंदिरातील भक्त निवास फुल्ल३० मार्चला जावळाच्या कार्यक्रमानिमित्ताने येणाºया भाविकांनी मंदिर परिसरातील भक्त निवासात राहण्यासाठी यापूर्वीच नोंदणी करून ठेवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मंदिरातील १२ भक्त निवास फुल्ल झाले आहे. अनेक भाविक यात्रोत्सवाच्या काळात मंदिरातील भक्त निवासमध्ये तीन ते चार दिवस राहत असतात. आदिशक्ती एकवीरा देवीच्या मुख्य गाभाºयालगत भव्य आशियाना मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मंडपातील चारही बाजुंना १० कुलूर ठेवण्यात येणार आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील विक्रेत्यांनी मंदिरापासून पुढे पंचवटीपर्यंत दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे