लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष भुमिका घ्यावी, निवडणूक काळात होणाºया गैरप्रकारांना आळा घालावा, मतदान केंद्रांवरील कर्मचाºयांना सुरक्षा पुरवावी, उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया यांनी आढावा बैठकीत दिल्या़राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया यांनी शनिवारी मनपात आढावा बैठक घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, निवडणूक आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे, निवडणूक निरीक्षक दिलीप जगदाळे, गोरक्ष गाडिलकर उपस्थित होते़ आढावा बैठकीत बोलतांना सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणेला अनेक सक्षम अधिकार देण्यात आले आहेत़ या अधिकारांचा योग्य वापर यंत्रणेने करावा़ निवडणूक प्रक्रिया निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाने दक्ष राहावे़ निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे, पैसे-मद्याचा गैरवापर होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यावी, आवश्यक तेथे तपासणी पथकांची संख्या वाढवावी, निवडणूक कामांत हलगर्जी, निष्काळजीपणा करणाºयांविरोधात कठोर कारवाई करावी, विविध अॅपचा प्रभावीपणे वापर करावा, अशा सूचना आयुक्त सहारिया यांनी दिल्या़ त्याचप्रमाणे त्यांनी सर्वोच्च न्यायालयांच्या विविध निकालांचा संदर्भ देत आवश्यक सूचना निवडणूक यंत्रणेला दिल्या़ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या शंकांचे निरसन केले़
निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष भुमिका घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:13 PM