ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.15 - शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथे घरकुल योजनेत पावणे चार लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बाबूलाल पवार या ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आह़े त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े
शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिमराव बाबुराव गरुड (51) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े 2014-15 या वर्षात शिंदखेडा पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेतून दराणे ग्रामपंचायत येथे लाभाथ्र्याना घरकूल मंजूर झाले होत़े दराणे येथील लिलाबाई नागराज पाटील या महिलेसह 19 जणांना पंचायत समितीकडून घरकुलाचे हप्ते वितरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया दोंडाईचा, बँक ऑफ इंडीया चिमठाणा, स्टेट बँक शाखा शिंदखेडा या बँकांच्या नावाने वितरण पत्र दिले होत़े या वितरण पत्रात बाबूलाल गोविंदा पवार (ग्रामरोजगार सेवक, रा़ दराणे ता़ शिंदखेडा) याने परस्पर सदर लाभाथ्र्याची नावे व बँक खात्याचा क्रमांक व्हाईटनरने खोडून स्वत:च्या व इतरांच्या नावे व खाते क्रमांक टाकल़े तसेच बनावट वितरणपत्र तयार करुन त्या आधारे लाभाथ्र्याच्या खात्यातून धनादेशाने रक्कम वटवून 3 लाख 85 हजार रुपयांचा अपहार करण्यात आलेला आह़े तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सुरु केलेला आह़े