शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

११३९ कामांवर ५ हजार ४०८ मजूरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 9:30 PM

एमआरईजीएस : पावसामुळे कामांवर परिणाम, शेतशिवारांमध्ये कामे वाढल्याने मजुरांची उपस्थिती घटली

धुळे : पावसाळ्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या घटली आहे़ जिल्ह्यात सध्या ११३९ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ४०८ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली़दरवर्षी पावसाळ्यात एमआरईजीएसच्या कामांवर परिणाम होतो़ शिवाय शेतशिवारांमध्ये कामे वाढल्याने शासनाच्या कामांवर मजुरांची उपस्थिती घटते़ ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहयोची कामे घेतली जातात़ परंतु पावसाळ्यात मजुरांना शेतात काम मिळत असल्याने कामांची संख्या कमी कमी होत जाते़ग्रामपंचायत स्तरावरील तालुकानिहाय कामे अशी:धुळे तालुकाजिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची ४ कामे सुरू आहेत़ या कामांवर ३८ मजुरांची उपस्थिती आहे़ घरकुलाच्या १२६ कामांवर ५१६ मजुरांची उपस्थिती आहे़ धुळे तालुक्यात जलसंधारण आणि कृषी विभागाचे एकही काम सुरू नाही़ तालुक्यात एकूण १३० कामांवर ५५४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़साक्री तालुकासाक्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण ४९५ कामांवर २१९५ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे़ त्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या २४ रस्ते कामांवर २१४ मजूर, जलसंधारणाच्या १८ कामांवर १८७ मजूर, घरकुलाच्या ४४४ कामांवर १७३६ मजूर, कृषी विभागाच्या ५ कामांवर ३१ मजूर तर इतर ४ कामावर २७ मजुरांची उपस्थिती आहे़शिंदखेडा तालुकाया तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ८ रस्ते कामांवर १३७ मजुरांची उपस्थिती आहे़ जलसंधारणाच्या १३ कामांवर १५९ मजूर, घरकुलाच्या ८७ कामांवर ३४१ मजूर, कृषी विभागाच्या सहा कामांवर ४५ मजुरांची उपस्थिती आहे़ शिंदखेडा तालुक्यात एकूण ११४ कामांवर ६८२ मजूरांची उपस्थिती आहे़ गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत तालुक्यात कामे वाढली आहेत़शिरपूर तालुकाशिरपूर तालुक्यात रस्त्याचे आणि जलसंधारणाचे एकही काम सुरू नाही़ केवळ घरकुलाची ३९७ कामे सुरू असून या कामांवर १९५० मजुरांची उपस्थिती आहे़ याशिवाय इतर तीन कामांवर २७ मजुरांची उपस्थिती आहे़ शिरपूर तालुक्यात एकूण ४०० कामांवर १९७७ मजुरांची उपस्थिती आहे़पावसाळा संपल्यानंतर यंत्रणा स्तरावर विकास कामांचे नियोजन सुरू होते़ साधारणपणे दिवाळीनंतर कामांना गती मिळते़ विविध विकासकामे हाती घेतली जातात़ त्यावेळी मजुरांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो़लॉकडॉनमुळे महानगरांमधून गावाकडे परतलेले मजुर अजुनही गावातच आहेत़ दिवाळीपर्यंत त्यांचा रोजगार सुरू होईलच याची शाश्वती नाही़ अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे़ त्यामुळे दिवाळीनंतर देखील प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कामांचे नियोजन करावे लागणार आहे यात शंका नाही़घरकुलाच्या कामांवर घरगुती मजूर४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कामे घरकुलाची सुरू आहेत़ घरकुल कामांच्या मस्टरवर सहसा कुटूंबातील मजुरांचे जॉबकार्ड असते़ त्यामुळे या कामांवर उपस्थित असलेले मजूर असतीलच असे नाही़ बऱ्याचदा मस्टरवर कुटूंबातील सदस्य असतात़ तर घराचे बांधकाम मात्र ठेकेदाराला दिलेले असते़ कुटूंबातील सदस्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की ठेकेदाराचे पैसे अदा केले जातात़ ही लाभार्थ्याची सोय आहे़

टॅग्स :Dhuleधुळे