शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 9:32 PM

महापालिका : हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित, अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण

धुळे : शहरातील मु्ख्य रस्त्यांवर अतिक्रमण करुन फेरीवाले, हॉकर्ससह विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहे़ त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहे़हॉकर्स झोनच्या प्रश्नावर चर्चा होऊन पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ मात्र हॉकर्स झोनच्या प्रश्नाबाबत मनपाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सची वाढती संख्या मनपासाठी भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकते़यापुर्वी शहर फेरीवाला समितीची बैठकीत घेण्यात आली. समिती सदस्यांनी चर्चेअंती पाच जागा निश्चित केल्या, त्यात साक्रीरोड वरील हॉकर्ससाठी मनपा शाळा क्रमांक १४, नकाणे रोड-जयहिंद कॉलनी व परिसरातील हॉकर्ससाठी आनंद नगरातील मनपाची मोकळी जागा, इंदिरा उद्यान परिसरातील फळविके्रते व अन्य हॉकर्ससाठी इंदिरा उद्यानामागील बोळ, दत्तमंदिर परिसरातील हॉकर्ससाठी नवरंग जलकुंभाशेजारील जागेऐवजी सुदर्शन कॉलनी येथील मोकळी जागा आणि मोहाडी परिसरातील हॉकर्ससाठी दसेरा मैदानाची जागा निश्चिती झाली होती़ मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागलाच नाही़मनपाचे आर्थिक नुकसानमहापालिका प्रशासनाकडून शहरातील व्यावसायिकांना हक्काची जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे़ ते महापालिकेचे दैनदिन बाजार शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दरवर्षी मनपाच्या बाजार समिती विभागाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते़प्रशाासन अपयशीहॉकर्सकडून मुख्य रस्त्यांवर होत असलेले अतिक्रमण वाढतच आहे़ संपूर्ण नियोजनानिशी व पूर्ण यंत्रणा कार्यान्वित केल्यास हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागू शकतो़ मात्र कोणत्याही सुविधा न पुरविता केवळ आखणी करून मनपा प्रशासनाकडून हॉकर्सच्या पुनर्वसनाचा घाट घातला जात असल्याने प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येते़शहरातील काही गुंडांनी इलेक्ट्रीक खांब, झाडांच्या आधाराने अतिक्रमणे केली आहेत़ तसेच रस्त्यांवर अतिक्रमण करून विकत घेतलेल्या जागेपेक्षा अधिकची जागा बळकाविली आहे़ कॉलनी परिसरात देखील अतिक्रमण करून रहदारीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत़हॉकर्स झोनचा प्रश्न सुटेना!फेरीवाल्यांची नोंदणी, बाजार शुल्क वसुलीचा तगादा लावला जात असला तरी प्रत्यक्षात हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही़ शहर फेरीवाला समितीची बैठक वर्षाभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही झालेली नाही.

टॅग्स :Dhuleधुळे