शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अतिक्रमणधारक रात्रभर रस्त्यावर मुक्कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 5:27 PM

रेल्वे स्टेशन रस्ता : संसारोपयोगी साहित्य उचलण्यासाठी दुस-या दिवशी गर्दी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ठळक मुद्देदिवसभर उपाशीपोटी; रस्त्यावरच मुक्कामाची वेळअनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे, तसेच सुख, दु:खाच्या प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणाºया येथील नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरल्यामुळे त्यांचा निवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यापार्श्वभूमीवर अनेकांनी रेल्वे स्टेशनरोडवर रात्र काढली. तर काहींनी मालेगावरोडवरील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात निवासाची व्यवस्था करून घेतली. रात्री थंडी वाजत असताना लहान मुलांना त्यांचे माता, पिता रात्रभर त्यांच्या मांडीवर घेऊन झोपली होती.तर घरे जमीनदोस्त झाल्यामुळे अतिक्रमणधारकांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळल्यामुळे गुरुवारी दिवसभरात अनेकांनी अन्नाचा कणही खाल्ला नसल्याच्या भावना आज अतिक्रमणधारकांनी एकमेकांशी बोलताना व्यक्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील तब्बल २४४ अतिक्रमणे गुरुवारी दिवसभरात भुईसपाट करण्यात आले. परिणामी, येथील अतिक्रमणधारक रात्रभर रस्त्यावरच मुक्कामी थांबून होते.  शुक्रवारी सकाळपासूनच  संसारोपयोगी साहित्य उचलण्यासाठी  अतिक्रमणधारकांची लगबग दिसून आली. परिसरात तणाव वाढू नये; यासाठी दुसºया दिवशीही पोलिसांचा बंदोबस्त तेथे तैनात होता. शहरातील रेल्वेस्टेशनरोडवरील अतिक्रमण मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी निष्काषित करण्यात आले. तब्बल १२ तास चाललेल्या या कारवाईत २४४ जणांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालल्याने येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. अर्धवट राहिलेले अतिक्रमण आज काढले गुरुवारी झालेल्या कारवाईत काही अतिक्रमित घरांच्या भिंती पाडण्याचे काम बाकी होते. ते शुक्रवारी नऊ वाजता एक जेसीबीच्या साह्याने पूर्ण करण्यात आले. अतिक्रमण काढल्यानंतर रेल्वे स्टेशनरोडवरील मातीचा ढिगारा व इतर साहित्य एका डंपरच्या माध्यमातून दसरा मैदान परिसरातील एका नाल्यात टाकण्यात आला. दुसºया दिवशीही रेल्वे स्टेशनरस्त्यावरील वाहतूक बॅरिकेट्स टाकून अडविल्यामुळे वाहनचालकांना चितोडरोडवरून व तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागले. 

सामान उचलण्यासाठी चिमुकलेही सरसावलेरेल्वे स्टेशनरस्त्यावरील अतिक्रमण निष्काषित झाले. त्यानंतर संबंधित अतिक्रमणधारक त्यांच्या घरातील विटा व घरकामासाठी उपयुक्त ठरणारे साहित्य रिक्षा, टेम्पो व ट्रॅक्टरच्या मदतीने सुस्थळी नेताना दिसून आले. हे काम करत असताना प्रत्येक घरातील लहान मुलेही त्यांच्या माता, पित्यांना विटा व साहित्य उचलण्यासाठी मदत करीत होते. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे चित्र येथे दिसले.