लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाºया आरोपी विनोद थोरातला अटक केल्यानंतर तीन मंत्र्यांच्या स्वीय सहायकांकडून त्याच्या फोनवर फोन आले़ त्याबाबत दोन पोलीस अधिकाºयांमध्ये झालेल्या संभाषणाची सीडी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली असून संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांना १० डिसेंबरपर्यंत जिल्हाबंदी करावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़धुळे मनपा निवडणूकीसाठी भाजपने ७४ जागांपैकी ६२ जागांवर कमळ या अधिकृत चिन्हावर उमेदवार दिले आहेत़ त्यापैकी २८ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत़ काहींवर ३०२, ३०७, ३९५ यांसारख्या असंख्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे़ शहरातील महिलांबद्दल अश्लील मजकूर प्रसिध्द केल्याबद्दलचे अनेक गुन्हे राज्यभरात घडले आहेत़ असा समाजकंटक विनोद थोरात समवेत तीन मंत्र्यांचे व त्यांच्या स्वीय सहायकांचे अखंड संभाषण सुरू होते़ पोलीस यंत्रणेने त्यास रात्री साडेअकरा वाजता ताब्यात घेतल्यानंतरही तो मंत्र्यांशी व त्यांच्या स्वीय सहायकांशी बोलत होता़ त्याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यादाखल सादर केलेल्या सीडीतून हे सिध्द होते की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या नावांचाही समावेश गुंडांना संरक्षण देण्यात आहे़ त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, नाना कर्पे व सर्व मंत्र्यांचे स्वीय सहायक यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करावी तसेच शासकीय अधिकाºयांचे दुरध्वनी निरीक्षणांखाली ठेवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
धुळे मनपा निवडणूक संपेपर्यंत तिन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 5:17 PM
अनिल गोटे : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, पत्रकार परिषदेत माहिती
ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषदतिन्ही मंत्र्यांना करावी, जिल्हाबंदी करण्याची मागणी