लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शासकीय दस्तऐवजमध्ये अधिकार नसताना नोंदी करुन शासनाची फसवणूक केली म्हणून साक्रीचे तहसीलदार संदिप भोसले यांनी या कटकारस्थानमध्ये सहभागी असलेल्या ५४ लोकांविरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़ यामध्ये तहसील कार्यालयातील एका कर्मचाºयाचा समावेश आहे़ या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये भामेर येथील शेतजमीन व शासकीय जमिनीचाही समावेश आहे़ सन २००१ ते २०१६ या कालावधीत साक्रीच्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख शाखेतील शिपाई पितांबर विष्णू साबळे या संशयितासह सुजन चंदू भील, धनुबाई सोनू ठेलारी, गंगुबाई सोनू ठेलारी (रा़ उभरांडी), भिलबाई मोतीराम, गुलाब पान्या, अनिल रेवबा सुर्यवंशी, विनोद गोटू मुसळे, तुकाराम चिनू गोयकर, अर्जुन कृष्णा कोतेकर, श्यामभाऊ हरचंद सोनवणे, नानाभाऊ हरचंद सोनवणे, डोंगर मोतीराम, दशरथ रुपचंद सोनवणे, सखाराम तुळशिराम ठेलारी, मोतीलाल रुपचंद धनगर, पंडीत रुपचंद धनगर, दला सदा (सर्व रा़ रोजगाव), प्रविण राजभाऊ माळी, संतोष बारकू, अशोक रामा, शोभाबाई छोटू मासुळे, शफियोद्दीन शेख अब्दुल, उत्तम दला कारंडे, किसन दला कारंडे, पिंटू दला कारंडे, भिकूबाई काशिराम माळी, मनोज काशिराम माळी, सुनंदाबाई, सरस्वतीबाई पोपट माळी, आकू शिवा, लकडू धर्मा माळी, पांडू भिका ठेलारी, कलाबाई पंडीत माळी, भिकनलाल गणेशलाल जयस्वाल, सारजाबाई आत्माराम जाधव, जितेंद्र गणेशलाल जयस्वाल, मुश्ताक रशीरबेग (सर्व रा़ भामेर), धनाजी मंगा गोसावी, महादू भिका (रा़ जैताणे), सुशीला हिलाल भील, नथ्थू वाघमोडे (रा़ शिवाजी नगर), घनश्याम मुरलीधर कुलकर्णी, कमला दत्तात्रय, विमलबाई रघुनाथ बळसाने (रा़ दातर्ती), भटा आबा ठेलारी, अवड्या धुडकू, गंगाबाई तुकाराम (रा़ ऐचाळे), विमल लक्ष्मण गोयकर, दादाभाऊ जगन्नाथ पाटील (रा़ भडगाव), सरदारसिंग नतेसिंग (रा़ इंदवे), वासू आबाजी वंजारी (रा़ खुडाणे), मोतीलाल रुपचंद धनगर, पंडीत रुपचंद धनगर (रा़ घाणेगाव) या एकूण ५४ संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आऱ एस़ पाटील करीत आहेत़ हा गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले़
शासकीय दस्ताऐवजात अधिकार नसताना नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:47 PM
५४ जणांवर गुन्हा : तहसीलदारांची कारवाई
ठळक मुद्देशासकीय दस्तऐवजमध्ये अधिकार नसताना नोंदी करुन शासनाची फसवणूकसन २००१ ते २०१६ या कालावधीत साक्रीच्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख शाखेतील प्रकारगुन्हा दाखल झाल्यामुळे साक्री तालुक्यात चर्चेला उधाण