ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.30 - महापालिकेच्या विशेष महासभेत गुरुवारी 2016-17 चा सुधारित व 2017-18 चा चालू अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला़ या अर्थसंकल्पात सदस्यांनी विविध त्रुटी काढत सुधारणा करण्याची मागणी केली़ अखेर अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली़
मनपाचा अर्थसंकल्प ब:याच विलंबाने अखेर गुरुवारी महासभेत सादर झाला़ महापौर कल्पना महाले यांच्यासह आयुक्त सुधाकर देशमुख, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ व सर्वपक्षीय सदस्य आणि अधिकारी सभेला उपस्थित होत़े सभेला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली़
त्या बिलांची चौकशी करा
मनपाने आतार्पयत तीन लाखांची अनेक बिले काढली असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर फारूख शाह यांनी केली़ तर सदस्य साबीर सैयद यांनी अर्थसंकल्पात कमालीच्या त्रुटी असल्याने तो नव्याने सादर करावा, अशी मागणी केली़
नालेसफाईचा ‘पंचनामा’!
नगरसेवक फिरोज लाला यांनी प्रशासनावर टीका करीत प्रशासनाला विकास नव्हे तर करवसुली पाहिज़े वैयक्तिक शौचालयांसाठी आतार्पयत 3 कोटी 96 लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही अनेक लाभार्थीचे अनुदान देणे बाकी आह़े नालेसफाईसाठी 20 लाख रुपयांची तरतूद असली तरी आपल्या प्रभागात येऊन आयुक्तांनी नाल्यांची परिस्थिती पाहावी, शौचालयांसाठी 2 कोटींची तरतूद असून आपल्या प्रभागात सार्वजनिक शौचालयांची परिस्थितीही दाखवतो, असे सांगत फिरोज लाला यांनी नाराजी व्यक्त केली़
अर्थसंकल्प ‘फेकमफाक’
शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी अर्थसंकल्प फेकमफाक असल्याचे सांगत पानांच्या क्रमांकानुसार त्रुटी सांगितल्या़ अंदाजपत्रकापेक्षा अडीच कोटी रुपये अधिकचा खर्च झाल्याचे सांगत त्यांनी तरतूद नसताना कामे कशी केली जातात? असा प्रश्न उपस्थित केला़ त्याचप्रमाणे एका धनदांडग्या ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी मनपाने स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केल्याचे परदेशी म्हणाले व जे करायचे ते कायद्याने करा, अशी मागणी त्यांनी केली़