आॅनलाइन लोकमतधुळे : येथील मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसगाड्यांच्या संख्येत वाढ झाली तरी, वेळापत्रक मात्र दोन वर्षांपूर्वीचेच होते. या संदर्भात ‘लोकमत’ने मध्यवर्ती बसस्थानकातील वेळापत्रक अद्ययावत करावे अशा मथळ्याखाली बातमी १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत, मध्यवर्ती बसस्थानकातील वेळापत्रक बदलविण्यात आले आहे.धुळे शहर हे तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने येथून तीनही राज्यात प्रवाशी एस.टी. महामंडळाच्या बसने मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. धुळे मध्यवर्ती बसस्थानकात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत बसची तसेच प्रवाशांची वर्दळ असते.बसस्थानकात जे वेळापत्रक लावले होते ते डिसेंबर २०१६ मधील होते. फलकावर ८५ गावांना जाणाºया बसगाड्यांच्या वेळा होत्या. मात्र यापैकी काही बसगाड्या बंद झाल्या होत्या तर काही नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र कोणत्या गाड्या सुरू झाल्या त्याची नोंद नसल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. या संदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित केली.त्याची दखल घेत धुळे आगाराने २२ फेब्रुवारी १९ पासून नवीन वेळापत्रक लावलेले आहेत. या वेळापत्रकाच्या फलकावर ८८ गावांना जाणाºया बसगाड्यांच्या वेळा देण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक लावल्याने प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.
अखेर धुळे मध्यवर्ती बसस्थानकातील वेळापत्रक बदलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:48 AM
दोन वर्षांपूर्वीचे होते वेळापत्रक, अनेक नवीन गाड्या सुरू झाल्याची नव्हती नोंद
ठळक मुद्देवेळापत्रक होते दोन वर्षांपूर्वीचेनवीन गाड्यांची नोंद नव्हतीप्रवाशांचा होत होता गोंधळ