चर्चेतील व्यक्तिशी थेट संवादविशाल गांगुर्डेएव्हरेस्ट मोहीम यशस्वी करण्याची प्रबळ इच्छा, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत उराशी बाळगली़ परिणामी चंद्रकला गावित यांनी यश मिळविले़ त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला़ प्रश्न : माऊंट एव्हरेस्टवर चढाईची संधी कशी मिळाली?गावित : आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य, सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी शौर्य मिशन २ राबविण्याचे ठरविले़ प्रकल्प अधिकारींमार्फत कळविण्यात आले़ इयत्ता, खेळाडू आणि अनुषंगिक बाबींमध्ये पात्र ठरल्याने एव्हरेस्ट चढाईची संधी मिळाली़ प्रश्न : पायथ्यापर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष एव्हरेस्टची चढाई याचा अनुभव कसा राहिला?गावित : माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी वर्धा, तेलंगणा, दार्जिलिंग, सिक्कीम, लेह-लडाख याठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आल्याचा फायदा झाला़ या ठिकाणच्या प्रशिक्षणात यशस्वी ठरली़ एव्हरेस्ट सर करताना आलेला अनुभव अप्रतिम असून तो मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही़ प्रश्न : माऊंट एव्हरेस्ट किती दिवसांत सर केले?गावित : काठमांडूमार्गे चीनमधून मी १९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चढण्यास सुरुवात केली़ आनंद, उत्साह असताना मनात थोडी भीती होती़ सर्वांच्या आशिर्वादाने मी २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एव्हरेस्टवर पोहचून भारताचा तिरंगा फडकविला आणि तो क्षण मी माझ्या मनात साठवून ठेवला आहे़ प्रश्न : शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराबाबत आपण काय सांगाल?गावित : एव्हरेस्ट सर केल्याबद्दल माझा आणि माझ्या परिवाराचा सन्मान करण्यात आला आहे़ राज्य शासनाकडून याकामी २५ लाखांचा निधीची मिळाल्याबद्दल मी शासनाच्या ऋणात राहू इच्छिते़ मला मिळालेल्या पैशांतून माझ्या भाऊ-बहिणीचे शिक्षण पूर्ण करणार आहे़ आई-वडीलांच्या पुण्याईमुळे मला हा निधी मिळाला असल्याचे समाधान आहे़ निधीचा योग्य विनियोग करेल़ क्रीडा क्षेत्रात यश मिळवेल मला उच्च शिक्षण घ्यायचे आहे़ माझी आवड क्रीडा क्षेत्रात असून त्यात प्रगती करण्याचा मानस आहे़ शिक्षण घेऊन समाजासाठी नागरीकांसाठी काम करण्याची इच्छा आहे़ समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा मार्गदर्शन करणार आहे़ मी स्वत: शिकणार असून माझ्यासोबत इतर सर्व विद्यार्थ्यांनाही शिकवेल़ परिणामी साक्री तालुक्यातील महूपाडा या गावाचा सर्वांगिण विकास साधला जाईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे़ जीवनामध्ये काहीही अशक्य नाही, असे माझे मत आहे़ वडिलधाºयांचा आशिर्वादमाझी स्वत:ची जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर न डगमगता, न घाबरता एव्हरेस्ट शिखर पार केले आहे़ वडील उत्तम गावित, आई कमलबाई यांच्यासह नातेवाईक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले़
शासनाकडून मिळालेल्या २५ लाखांच्या निधीतून माझे भाऊ- बहिण, आई-वडिलांसाठी विनियोग करेल़ - चंद्रकला गावित