आॅनलाइन लोकमतधुळे : समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे, डीआयईसीपीडी धुळे, जय वकील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शुन्य ते १८ वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुंबई येथील डॉक्टरांच्या पथकाने ४३२ विद्यार्थ्यांची तपासणी केली.हे शिबिर धुळे-जळगाव महामार्गावरील जिल्हा परिषद शाळा, बाळापूर धुळे घेण्यात आले.मस्तिष्क आजार निदान व उपचार शिबिरात ४८८ मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात धुळे तालुका १६३ धुळे महानगरपालिका ७६ शिंदखेडा ६६ साक्री तालुका ६४ शिरपुर तालुका ९४ व इतर जिल्ह्यातील २४ याप्रमाणे ४८८ मुलांची नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी झालेल्यांपैकी ४३२ मुलांची मोफत तपासणी करण्यात आली.जसलोक व वाडिया हॉस्पिटल मुंबई येथील प्रसिद्ध पेडियाट्रीक नुरोलॉजिस्ट डॉ. अनिता हेगड़े यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विशाल पटेल, डॉ. निशांत राठोड़, डॉ. अंशिता, डॉ. राधिका, डॉ. अंकित, धारा बंगेरा, प्रवीण मधुर, विशाखा शेलार, गगन प्रीत गील, ईशा रमण, गौरी बावकर,रश्मी देसाई सायली परब, पूजा चोरमले, स्नेहा देसाई,रिमा देसाई, अक्षता माधव, गोपिका कपूर, संदीप वैद्य, अदिती झा, विधी शहा, डॉ. सुजाता बनसोडे, हेमा परब, यांच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील मस्तिष्क आजार असलेले, मतिमंद, आॅटिजम, मेंदूचा पक्षघात, फिट्स, मुव्हमेंट डिसआॅडर, सेरेबल पाल्सी असणाºया दिव्यांग बालकांचे मोफत निदान व तपासणी केली. विविध प्रकारच्या तपासण्यांमुळे गरीब पालकांना महत्वाची मदत झाली आहे. या शिबिर मधून ज्या मुलांना शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे त्यांच्यावर मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे.
मस्तिष्क शिबिरात ४३२ विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 6:32 PM