लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षापासून कडक पाऊले उचलण्यात आलेली आहेत. असे असले कॉपीचे तुरळक प्रकार घडलेच. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. उर्वरित सर्वच केंद्रावर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.इयत्ता १२ वीची बुधवारपासून बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ४४ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली असून जिल्हयात बारावीचे पाच उपद्रवी केंद्र आहेत. धुळे शहरातील सात केंद्रावर परीक्षा होत आहे.आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. परीक्षा मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आहे. यावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.एकाही विद्यार्थ्याला उशिर नाहीयावर्षी ११ वाजेनंतर परीक्षा केंद्रात येणाºया विद्यार्थ्याला पेपरला बसू न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात एकाही केंद्रावर विद्यार्थी उशिरा आले नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.कॉपीचे तुरळक प्रकारसर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. ११ वाजेनंतर केंद्राचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने, कोणालाही आत जाणे शक्य होत नव्हते. पोलीस तैनात असल्याने, बाहेरून कॉपी देण्याच्या प्रकारालाही बºयापैकी आळा बसला होता. मात्र काही परीक्षार्थींनी आत जातांनाच सोबत कॉपी नेली होती. कॉपी झाल्यानंतर त्या खिडकीतून बाहेर फेकण्यात येत होत्या.एकास पकडलेशहराबाहेर असलेल्या एका केंद्रावर परीक्षार्थीला कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया इसमाला पोलिसांनी पकडून ‘प्रसाद’ दिल्यानंतर सोडून दिले.समर्थकांची गर्दीदरम्यान कॉपी पुरविण्यासाठी काही परीक्षार्थींच्या मित्रांनी केंद्राजवळच गर्दी केलेली होती. त्यांना हुसकावून लावतांना पोलिस, होमगार्डांना मात्र कष्ट घ्यावे लागले.काही केंद्राजवळच विद्यार्थ्यांनी फेकलेल्या कॉप्या जाळून टाकण्याचाही प्रकार घडला.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.