शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा वगळता उर्वरित तालुके टंचाई मुक्त

By अतुल जोशी | Published: October 09, 2023 3:05 PM

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र ॲागस्ट महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारली.

धुळेपाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील १४४ गावांमध्ये विहिर अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलस्त्रोताची समस्या काही प्रमाणात सुटलेली आहे. जिल्ह्यात आता फक्त शिंदखेडा२८ गावांसाठी विहिर अधिग्रहित व एक टँकर सुरू आहे. उर्वरित धुळे, साक्री, शिरपूर तालुक्यातील ११६ विहिर अधिग्रहित मुक्त झालेले आहे.

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्रॲागस्ट महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारली. पावसाअभावी जलस्त्रोतही आटले. परिणामी अनेक गावांना पाणी टंचाईची तीव्रता वाढली. यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत धुळे तालुक्यासाठी १७, साक्री तालुक्यासाठी ८२ शिरपूर तालुक्यासाठी पाच तर शिंदखेडा तालुक्यासाठी ३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.सप्टेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे विहिरींची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरेत सोडल्याने, पांझरा काठावर असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहरींमध्येही पाणी पातळी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने दिलासा दिल्याने, धुळ्यासह साक्री, शिरपूर तालुक्यातील गावे विहिर अधिग्रहण मुक्त झालेले आहे. तर आता फक्त शिंदखेडा तालुक्यातच पाणी टंचाई असून, अॲाक्टोबर महिन्यातही या तालुक्यातील २८ गावांसाठी विहिर अधिग्रहित कायम आहे. तर तालुक्यातील धावडे गावाला अजुनही टँकरद्वारेच पाणी पुरवठा होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेwater scarcityपाणी टंचाई