धुळे : शहरातील कोळवले नगर ते परमार लॉन्स दरम्यान दुचाकीवरुन विदेशी दारुची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्या जवळून वाहनांसह दारु जप्त करण्यात आली़ शिवाय त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला़१८ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कोळवले नगराकडून परमार लॉन्सकडे जाणारी एमएच १८ बीपी ०२२० ही दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने अडविली़ दुचाकीवरुन विदेशी दारुची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या तपासणीतून आढळून आले़ याप्रकरणी उमेश प्रमोद कापसे (२७, रा़ कोतवाल नगर, धुळे) आणि रोहित शिवाजी कंड्रे (३२, ऊसगल्ली, धुळे) अशा दोघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून ३५ हजाराच्या मोटारसायकलीसह १२ हजार ३०० रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली़ या दोघांच्या विरोधात उमेश पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला़ हेड कॉन्स्टेबल भामरे घटनेचा तपास करीत आहेत़देवपुरातही कारवाईदेवपूर पोलिसांनी रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास पंचवटी चौक येथून विक्की राजाराम गोसावी (२७) या संशयिताला दारु बाळगली म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्या तरुणाकडून रोख रकमेसह दारु मिळून ९ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सागर शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ हेड कॉन्स्टेबल बागुल घटनेचा तपास करीत आहेत़
दुचाकीवरुन विदेशी दारुची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 8:46 PM