लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खरीप हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा भरण्याची मुदत आज ३१ जुलै रोजी संपत आहे. धुळे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही पिकविमा भरलेला नसल्याने पीकविमा भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी धुळे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक, धुळे यांच्याकडे केली आहे.यापूवीर्ही विमा कंपन्यानी अनेक वेळा खरीप पिकविमा प्रिमियम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात कुठे कमी कुठे जास्त पाऊस आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटाला देखील सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा शेतीच्या कामात अनेक शेतकºयांनी अद्यापही पिक विमा प्रिमीयम भरलेला नाही. मागच्या वर्षी जे उत्पन्न आले ते देखील कोरोनाच्या महामारीमुळे अनेक शेतकºयांच्या घरात आजही पडून आहे. तसेच धुळे तालुक्यातील शेतकºयांची गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे परिस्थिती अतिशय हालाकीची झाली आहे. हातात जेवढा पैसा होता तो खरीप हंगामात बियाणे, खते व शेती कामासाठी वापरला गेला. म्हणून अनेक शेतकºयांकडे पिकविमा भरण्यासाठी पैसा नाही, बॅका पिकविमा भरण्यास सहकार्य करीत नाहीत. त्यात पिकविमा भरण्याची ३१ जुलै ही शेवटची मुदत आहे. अद्याप अनेक शेतकºयांनी विमा भरलेला नाही. त्यांच्यासाठी योजनेला मुदत वाढ देण्याची आवश्यकता आहे. तरी शासनाने ती वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची मुदत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:45 PM