ठळक मुद्देयासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असली तरी आता यापुढे काम करणार नसल्याचे ठरले आहे. शनिवारी आतापर्यंत केलेल्या कामाचे दप्तर हे प्रशगेल्या महिन्यात प्रशासनाशी चर्चा केली. तेव्हा बीएलओंना काम करण्यासाठी सहाय्यक बीएलओ देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, प्रशासनाने ते केले नाही, असे पाटील यांनी सांगितले. आता मुदतवाढ मिळाली असली तरी हे काम करणार नसल्याची भूमिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी घेतल्याची असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुदतवाढ मिळाली असली तरी प्राथमिक शिक्षकांनी आता बीएलओचे काम करण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेसमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात बीएलओंनी या कामावर बहिष्कार टाकला होता. तेव्हा उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करून शिक्षकांना ३० नोव्हेंबरपर्यंत काम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, पुन्हा बीएलओंनी कामास नकार दिला