ऑनलाइन लोकमतशिरपूर, जि. धुळे, दि. 23 - शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकाने नोकरी लागेल या आशेने पुणे येथील एका बनावट कंपनीत 1 लाख 20 हजार रूपये भरले. मात्र, त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 5 जणांविरूध्द शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आह़ेललित विश्वनाथ चौपाळे (रा़वासुदेव बाबानगर, शिरपूर) हा नोकरीच्या शोधात होता़ त्याने इंटरनेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरले होत़े त्यापैकी मॅक्स जॉब प्लेसमेंट या नावाच्या नोकरी देणा:या कंन्सल्टन्सी कंपनीकडे 3 हजार रूपये भरून त्याने नोंदणी केली. त्यामुळे 16 मार्च 2017 रोजी विजय भारद्वाज यांनी त्याला मेल करून नोकरीची हमी दिली़ त्यानंतर 20 मार्च रोजी रिया ठाकूर हिने अॅमडांस या कंपनीत एच़आऱ या पदावर काम करत असल्याचे सांगून मोबाईलद्वारे मुलाखत घेतली, त्यानंतर तिने निवड झाल्याचे एका तासानंतर कळविल़े त्यावेळी तिने 4 हजार रूपये भरायला सांगितल़े पुन्हा थोडय़ावेळाने तिने 12 हजार 500 रुपये बँक खात्यात भरायला सांगितल़े नोकरी लागेल म्हणून चौपाळे यानेदेखील त्यांनी सांगितल्यानुसार पैसे बँकेत भरले. 21 रोजी मेलद्वारे नोकरी मिळाल्याचे कळवून 3 लाख 20 हजाराचे पॅकेज असल्याचे सांगितल़े 23 मार्च रोजी पुन्हा रिया ठाकूर हिने सिक्युरिटी डिपॉजिट भरावी लागेल म्हणून चौपाळे यांनी 23 हजार 500 रूपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले. 27 रोजी पुन्हा 35 हजार रूपयांची मागणी केल्यामुळे तीदेखील रक्कम भरली़ पुन्हा एजंट डोनेशन म्हणून 45 हजार रूपये भरल़े अशाप्रकारे चौपाळे याने 1 लाख 20 हजार रूपये भरले. यानंतर ललित याला फसवणूक झाल्याची शंका आल्याने त्याने 13 एप्रिल रोजी पुणे येथे कंपनीत जाऊन चौकशी केली असता अशाप्रकारचा व्यवहार येथे होत नसल्याची माहिती त्याला देण्यात आली़ याबाबत संशयित आरोपी विजय भारद्वाज रा.दिल्ली, रिया ठाकूर, कोमल कुमारी, ब्रिजेश बहादुरीया, राजेश (सर्व राहणार सायबर सिटी टॉवर, मगर पट्टा, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पुण्याच्या बनावट कंपनीने लावला शिरपूरच्या युवकाला सव्वा लाखाचा चूना
By admin | Published: April 23, 2017 6:35 PM