ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.16 - एटीएम कार्ड व पिन नंबर प्राप्त करून एकाच्या बँक खात्यातून परस्पर 60 हजार रुपये अनोळखी खात्यावर वर्ग करून फसवणूक केल्याची घटना बुधवारी दुपारी अवधान गावातील स्टेट बँक शाखेत घडली़ याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मंदीपकुमार अमरेंद्र मंडल (रा़ गंगापूर, ता़ मुरलीगंज, जि़ मध्यपुरा, बिहार, ह़मु. मोहन नवले यांच्या घरात चक्करबर्डी शिवार, धुळे) हा तरुण बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अवधान येथील स्टेट बँक शाखेत आला होता़ सोबत हमालीचे काम करणा:या मजुराच्या बँक खात्यावर पैसे टाकण्यासाठी तरुणाने विश्वासाने दोन अनोळखी इसमांकडे त्याच्या वडिलांचे एटीएम कार्ड देऊन पिन नंबरदेखील सांगितला़ दोघांनी मजुराच्या खात्यावर पैसे पाठवून देतो, असे सांगितल़े त्यानंतर दोघांनी एटीएम कार्ड व पिन नंबर प्राप्त करून तरुणाच्या वडिलांच्या नावे असलेल्या स्टेट बँक खात्यातून 60 हजार रुपये अनोळखी खात्यावर वर्ग केल़े तसेच मंदीपकुमार याचा एक हजार रुपये किमतीचा मोबाइलदेखील घेऊन गेल़े आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंदीपकुमार मंडल याने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़