ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.22 : गेल्यावर्षी शेतक:यांना मंजूर झालेल्या पीक व फळ पीक विम्यापोटी 25 कोटी रुपयांचे अनुदान शेतक:यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सुमारे 35 हजार शेतक:यांना पीक विमा फळपीक विमा मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना 2016-17 च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्य शासनाने जिल्ह्यात ही योजना लागू केली होती. कर्जदार शेतक:यांना सक्तीची तर कर्ज न घेणा:या शेतक:यांना ऐच्छिक स्वरूपाची होती.
जिल्ह्यातील 33 हजार 773 शेतक:यांना पीक विम्याचे 18 कोटी 90 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. ज्या महसूल मंडळात पीकनिहाय विमा मंजूर झालेला आहे, अशा शेतक:यांनी त्यांनी ज्या बॅँकेच्या शाखांमध्ये या पीक विमा योजनेचा हप्ता भरला होता, त्या बॅँकेकडे जाऊन शेतक:यांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री करावी.
धुळे तालुका 6 कोटी 23 लाख, साक्री 3 कोटी 90 लाख,शिंदखेडा 8 कोटी 47 लाख व शिरपूर तालुका 30 लाख रुपये, अशी तालुकानिहाय पीक विम्याची रक्कम आहे.
जिल्ह्यात गतवर्षी हवामान आधारित फळ पीक विमा योजना डाळिंब पिकासाठी लागू करण्यात आली होती. जिल्ह्यातील 1 हजार 142 शेतक:यांनी त्यात सहभागी होऊन हप्ता भरला होता. या सर्व शेतक:यांना 5 कोटी 89 लाख रुपये फळ पीक विम्यापोटी मंजूर झाले आहेत.