धुळे : पावसाने ओढ दिली असून त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आल्याने, नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील न्याहळोद येथे घडली. धर्मराज हिमतराव वाघ (वय ६८) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
जून महिन्यापासून पावसाळा सुरू झालेला आहे. मात्र न्याहळोद परिसरात जून महिन्यात पाऊस झाला नाही. जुलैतही अल्पसा पाऊस झाला. अशाही परिस्थिती वाघ यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र ॲागस्टमध्ये पावसाने ओढ दिली. पावसाअभावी खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपू लागली आहे.
त्यामुळे निराश झालेल्या धर्मराज वाघ यांनी मंगळवारी सकाळी शेतात कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे