ऑनलाईन लोकमत
पिंपळनेर, दि.6 : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक:यांना कांदा मार्केटमध्ये आणावे, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, आज साक्री, पिंपळनेर, जैताणे व दहिवेल येथील कांदा मार्केट सुरू होते. तरीही एकाही शेतक:यांनी कांदा विक्रीसाठी आणला नाही. त्यामुळे मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला.
कांदा उत्पादक शेतक:यांना चांगला भाव मिळावा, याउद्देशाने साक्री तालुक्यातील जैताणे व दहिवेल येथे 1 मेपासून कांदा मार्केट सुरू झाले. सुरुवातीला कांद्याची मोठी आवक सुरू झाली होती. परंतु, आता सहा दिवसांपासून शेतक:यांचा संप सुरू असल्यामुळे कांदा मार्केटमध्ये शेतक:यांचा शुकशुकाट दिसून येत आहे. पिंपळनेर येथे प्रसिद्ध असलेल्या कांदा मार्केटमध्ये गेल्या सहा दिवसात कांद्यातून होणारी उलाढाल मंदावली आहे. एका एकर कांद्यासाठी समारे 55 ते 58 हजार रुपये खर्च येतो. परंतु, त्यातुलनेत शेतक:यांना योग्य हमीभाव मिळत नाही.
5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याने शेतकरी आले नाही. पण आज सुरळीत व्यवहार सुरू असतानाही कांदा उत्पादक शेतकरी साक्री, पिंपळनेर, जैताणे व दहिवेल येथील कांदा मार्केटमध्ये आले नाही. गेल्या सहा दिवसात लाखो रुपयांचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ए. एन. मोरे यांनी दिली.
कांदा निर्यातही ठप्प
दरम्यान, साक्री तालुक्यातून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यात होणा:या कांद्याची निर्यातही ठप्प झाली आहे.