ऑनलाईन लोकमत
तिसगाव, जि. धुळे, दि.8 - धुळे तालुक्यातील वडेल गावात शनिवारी सकाळी जंगलातून भरकटलेल्या काळवीटवर दहा ते बारा कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या परिसरात काम करणा:या एका शेतक:याच्या निदर्शनास ही घटना आली व त्यांनी तत्काळ कुत्र्यांच्या तावडीतून काळवीटाची सुखरूप सुटका करून जीव वाचवला. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी अवस्थेत काळवीटाला उपचारार्थ धुळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
शिंदखेडा वनविभागांतर्गत सोनगीर मंडळातील वडेल बिटातील जुन्या निमडाळे रस्त्याजवळील लेंडय़ाच्या धरण परिसरात ही घटना घडली. या भागात जंगली प्राण्यांचा संचार असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. शनिवारी सकाळी एक काळवीट असेच भटकंती करत या परिसरात आले होते. त्याचवेळी अचानक जंगली कुत्र्यांनी या काळवीटावर हल्ला केला.
वडेल येथील शेतकरी गुमान शेनपडू नाईक (भिल) हे त्यांच्या शेतात काम करीत होते. त्याचवेळी जंगली कुत्र्यांनी काळवीटला कचाटय़ात पकडल्याचे पाहून शेतकरी गुमान यांनी त्यांच्या हातातले काम सोडत व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शेतातील लोखंडी पावडी उचलून जंगली कुत्र्यांवर हल्ला केला. त्यानंतर जंगली कुत्रे सैरावैरा पळून गेले. त्यामुळे काळवीटाचे प्राण वाचवता आले.
या हल्ल्यात काळवीटच्या पुढच्या व मागच्या पायावर गंभीर इजा झाली आहे. शरीराच्या इतरही भागात जखमा झाल्या आहेत.
घटनेनंतर वनविभागाच्या अधिका:यांना कळविण्यात आले. परंतु, दोन तास होऊनही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले नाही.