ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा, दि.15 - शिंदखेडा पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाचे तांत्रिक अधिकारी नरेश देवीदास बोरसे यांना विहीरीचे अनुदान देण्यासाठी शेतक:याकडून 5 हजाराची लाच घेताना गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील शेतक:याकडून मंजूर विहीरीचे 94 हजार 616 रुपयांचे अनुदान देण्यासाठी पंचायत समितीतील लघुसिंचन विभागाचे तांत्रिक अधिकारी नरेश देवीदास बोरसे याने 5 हजारांची लाच मागितली. शेतक:याने याबाबत धुळे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी दुपारी शिंदखेडा पंचायत समितीत सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या अधिका:यांनी शेतक:याकडून साक्षीदार समक्ष 5 हजाराची लाच घेतांना तांत्रिक अधिकारी नरेश बोरसे याना रंगेहात पकडले.