पिंपळनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने, यात ६० वर्षीय शेतकºयाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडवाजेच्या सुमारास घडली. अपघात होताच चालक वाहन सोडून फरार झाला.शहरातील गोपाल नगर येथील नरेश रामदास पगारे (वय ६२) हे आपली दुचाकी (क्र.एम.एच. ३९- बी. ८०२०) घेऊन उभे असताना पिंपळनेरकडून नवापूरकडे भरधाव जाणाºया आयशरने (जी. जे. १९- एयू ५०३१) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात नरेश पगारे यांना डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात होताच चारचाकी गाडी चालक वाहन सोडून फरार झाला. दरम्यान अपघात झाल्यानंतर शहरातील काही नागरिकांनी या रस्त्यावर गतिरोधक टाकावा यासाठी एकतास रास्तारोको आंदोलन केले. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी आश्वासन देत नागरिकांची समजूत काढल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.दरम्यान राजेंद्र पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकीच्या धडकेत शेतकरी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 9:30 PM