लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : तालुक्यामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. ट्रॅपिंग व अतिरिक्त वीज भाराची समस्याही वाढली आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून शेतकऱ्यांनी तहसीलदार व वीज कंपनीच्या अधिकाºयांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.शेतकºयांनी तहसीलदार, वीज कंपनीचे डेप्युटी इंजिनिअर चौरे, गिरासे यांच्यासोबत चर्चा केली. नवीन प्रस्थापित सबस्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे. सद्यस्थितीमध्ये वीज वारंवार खंडित होते. त्यामुळे शेतकºयांना विहिरीत पाणी असूनसुद्धा सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकरिता तालुक्यांमध्ये उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी साक्री पंचायत समितीचे उपसभापती अॅड.नरेंद्र मराठे, साक्री पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी व शेतकºयांनी केली आहे.
खंडीत वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:06 PM