ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.20 - शहरासह जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी, शेतकरी चिंतातूर झाले आहे. शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील काही ग्रामीण भागात अद्याप पाऊसच झालेला नसल्याने शेतक:यांनी पेरणीचे कामे लांबणीवर टाकले आहे; तर धुळे तालुक्यातील कापडणे गावातील शेतक:यांनी आता पाऊस येईल? या आशेवर दुबार पेरणीचे कामे सुरू केली आहेत.
हवामान विभागाचे भाकीत फोल
पिंपळनेर : हवामान खात्याने यावर्षी मान्सूनबाबत केलेले भाकीत फोल ठरले आहे. पिंपळनेरसह परिसरात मृग नक्षत्राने पाठ फिरवली असून पेरणी कशी करावी? असा प्रश्न येथील शेतक:यांसमोर आहे. परिणामी, पिंपळनेरसह परिसरातील पेरणीची कामे ठप्प झाली आहे. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले, त्याचे वाहन हत्ती होते. 8 जून रोजी मृग नक्षत्र लागले, तरीही पाऊस झाला नाही. आता 21 जूनपासून आद्र्रा नक्षत्र सुरू होत आहे, त्याचे वाहन म्हैस असून या नक्षत्रात तरी पाऊस येईल? अशी आशा शेतक:यांना लागून आहे.
पावसाअभावी पिके करपली
साक्री तालुक्यातील बळसाणेसह परिसरात पावसाअभावी पिके करपत चालली आहे. येथील परिसरात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी दिली होती. त्या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी त्यांच्या शेतातील पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
पेरणी झाली; मात्र पावसाने मारली दडी
शिंदखेडा तालुक्यात 50 टक्क्यांवर शेतजमिनीत पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने गेल्या दहा दिवसांपासून दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट शेतक:यांवर येऊन ठेपले आहेत. जून महिना संपत आला तरीदेखील तालुक्यात 14 गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर 47 गावांना विहिरी अधिग्रहणाने पाणीपुरवठा केला जात आहे.
शिंदखेडा तालुक्यात यावर्षी पावसाने रोहिणी नक्षत्रातच हजेरी दिली. त्यात 1 जून रोजी शिंदखेडा तालुक्यातील निम्म्या भागात पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश शेतक:यांनी कपाशी व इतर पिकांची पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने आता दुबार पेरणीची वेळ शेतक:यांवर आली आहे.
अल्प पावसाच्या जोरावर पीक पेरा
शिंदखेडा तालुक्यातील वर्शीसह परिसरात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतक:यांनी पिकांची लागवड केली. पुढेही पाऊस येईल, या आशेवर येथील शेतक:यांनी महागडी बियाणे आणली. मजुरांना लावून कापूस, मूग, बाजरी व मक्याचा पीक पेरा केला. परंतु, त्यानंतर पाऊसच न झाल्याने येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.