लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी वसंत तुकाराम (धुडकू) बागल (६०) यांनी गळफास घेतला़ ही घटना बुधवार १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी राहत्या घरी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली़ वसंत बागल उर्फ तात्या हे एका पायाने अपंग होते़ आपल्या तीन ते चार एकर शेतीवर तीन मुलींचा विवाह, एका मुलाला शिक्षण देवून पत्नीसह आपला प्रपंच चालवित होते़ सतत दुष्काळी परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला़ पावसाच्या हुलकावणीमुळे येणाºया उत्पन्नाचा अंदाज नव्हता़ त्यात डोक्यावर कर्जाचा बोझा असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे़ दरम्यान, श्रावण महिना सुरु झाला आहे़ बागल यांच्या घरी कानबाई मातेची प्रतिष्ठापना होणार होती़ पण, त्यातच मरण्याअगोदर बागल यांनी राहत्या घराच्या भिंतीवर काडीने कोरुन ‘माता मला माफ कर’ असे लिहून ठेवले असल्याचे समोर आले आहे़ या घटनेमुळे निमगुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे़
निमगुळ येथे शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:14 PM
कर्जबाजारीपणा : गावात व्यक्त होतेय हळहळ
ठळक मुद्देनिमगुळ येथील होता शेतकरीगळफास घेऊन संपविले जीवनगावात व्यक्त झाली हळहळ