लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नेर येथून जवळच असलेल्या नवे भदाणे गावात कापूस मोजण्यासाठी वाहनात सुमारे अडीच क्विंटलचे दगड भरून ‘मापात पाप’ करणाºया व्यापाºयाची बनवेगिरी शेतकºयांनी उघडकीस आणली. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकºयांनी त्यास चांगला चोपही दिला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. मात्र, शेतकºयाने तक्रार न दिल्याने याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दिवाळी सण जवळ आल्याने कापूस विकून सण साजरा करण्यासाठी शेतकरी घरात आलेला कापूस विक्री करीत आहे. शेतात वर्षभर घाम गाळून पिकवलेला कापूस व्यापारी अगोदरच मातीमोल भावाने खरेदी करीत आहे. शेतकरीही दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक झळ सोसून ४ हजार ते ५ हजार ४०० रुपये क्विंटल दराने कापूस विकत आहे. हा कापूस खरेदी करताना व्यापाºयाकडून शेतकºयांची फसवणूक करण्याचा अजब फंडा नवे भदाणे येथील घटनेने समोर आला आहे. जुनेभदाणे येथील शेतकºयाचा अकरा क्विंटल कापूस तोलकाट्याने मोजून खरेदी करून व्यापाºयाने त्यात महामार्गावरील अंतर दर्शवणारे अडीच क्विंटलचे दगड भरले. त्यानंतर नेर येथील भुईकाट्यावर जाऊन मोजणी केली. दगडामुळे कापसाचे वजन साडेतेरा क्विंटल भरले. तशी पावतीही व्यापाºयाने घेतली. त्यानंतर नवे भदाणे येथील शेतकºयाचा कापूस खरेदीसाठी जाताना गाडीत ठेवलेले दगड रस्त्यात फेकून दिले. हे दगड फेकताना एका शेतकºयाने त्यांना पाहिले. त्यामुळे काही दगड गाडीतच राहिले. नवे भदाणे येथील शेतकºयाचा कापूस खरेदी केल्यावर तोल काट्यावर जाण्यापूर्वी बाकीचे राहिलेले दगड फेकून देऊ, असा विचार करुन वाहन नवे भदाणे येथे आले. येथे कापूस खरेदी सुरू केली. दरम्यान, गाडीतून दगड फेकण्याचा प्रकार पाहिलेल्या शेतकºयाने गावातील शेतकºयांना पाहिलेला प्रकार सांगितला. त्यामुळे शेतकºयांनी व्यापाºयाच्या वाहनाची झडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणावर दगड आढळून आले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी व्यापाºयाला चांगलाच चोप दिला. यानंतर हे प्रकरण नेर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यापर्यंत गेले. मात्र, आपसात प्रकरण मिटवून शेतकºयाने तक्रार देण्यास नकार दिल्याने याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
कापूस मोजणीत घोळ करणाºया व्यापाºयाला शेतकºयांचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:41 AM
वाहनात अडीच क्विंटल दगड टाकून बनवाबनवी
ठळक मुद्देदगडामुळे कापसाचे वजन साडेतेरा क्विंटल भरलेप्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. शेतकºयाने तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल नाही