चंद्रकांत सोनार।धुळे : धुळे शहर विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार फारूख शाह यांनी विजय मिळविला. मातब्बर असलेल्या दोन माजी आमदारांसह शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. मताधिक्याने त्यांनी विजय साजरा केला. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद येथे अनपेक्षितपणे एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. त्या पॅटर्नची धुळ्यात पुनरावृत्ती झाली, असे म्हणावे लागेल. या विजयाने राजकीय विश्लेषकांच्या भुवयाही उंचावल्या असून शहर मतदारसंघात आश्चर्यकारक विजयाची नोंद झाली आहे.फारूख शाह हे मुळात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते होते. महापालिकेवर राष्टÑवादी कॉँग्रेसची सत्ता असताना त्यांनी महापालिकेचे उपमहापौर पदही भूषविले होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी गतवर्षी झालेली महापालिकेची निवडणूकही लढवली होती. परंतु ते पराभूत झाले होते. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने चार जागा जिंकून धुळ्याच्या राजकारणात चंचूप्रवेश केला. तेव्हापासून या पक्षाविषयीचे आकर्षण वाढत गेले. विशेषत: शहर मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागात या पक्षाचा अधिक जोर दिसून आला. या निवडणुकीपूर्वी एमआयएम पक्ष कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. शहर मतदान संघातून शिवसेना, लोकसंग्राम, मनसे, बसपा, अपक्ष असे एकून १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ त्यात खरा सामना माजी आमदार अनिल गोटे व राजवर्धन कदमबांडे यांच्यात होता़ २०१४ च्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला. तसेच मुस्लिम बहूल भागात एमआयएमचे उमेदवार डॉ़ फारूख शाह यांना मुस्लिम प्रभागातून एकगठ्ठा मतदान मिळाल्याने अनेकांनी विजयाची अपेक्षा सोडली होती़ एरव्ही मुस्लिम बहूल भागातून मताधिक्य मिळविणारे राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडणूक लढविली़ त्यामुळे पहिल्यांदा मुस्लिम मतांचा फायदा एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉ़ शाह यांना झाला़ विकासाच्या मुद्यावर गोटे लोकसंग्राम व २०१४ च्या निवडणूकीत भाजपाकडून विजयी झाले होते़ मात्र लोकसभा निवडणूकीत अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत देखील गोटे यांच्या पराभवाची तयारी केल्याचे विधान केले होते़ शहर विकासाच्या मुद्यावर गोटे यांना मिळणारी मते मराठा विरूध्द बहूजन अशा वर्गात विभागली गेली़ त्यामुळे गोटेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहेत़ गोटे यांच्या पराभरासाठी महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांना मदत न करता भाजपाकडून कदमबांडे यांना छुुपा पाठींबा देण्यात आला होता धुळ्यातील सभेत उध्दव ठाकरे यांनी ‘आम्ही पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची औलाद नाही, तुम्ही देखील सिध्द करा’ अशी टीका मित्र पक्षाचे नाव न घेता केली होती़ महायुतीकडून हिलाल माळींना अपेक्षित मदत न मिळाल्याने मतांचा आकडा वाढला नाही़ त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला़ अनिल गोटे यांच्या पराभवासाठी मतांचे विभाजन कारणीभूत ठरले. कदमबांडे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे मुस्लिम मतांचा सर्वाधिक फायदा एमआयएमच्या फारूख शाह यांना झाला व ते विजयी ठरले.
फारूख शाह स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुस्लिम आमदार ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:28 PM
मातब्बरांना मात : औरंगाबाद पॅटर्नची धुळ्यात पुनरावृत्ती
ठळक मुद्देमहापालिकेचे उपमहापौर पदही भूषविले मुस्लिम प्रभागातून एकगठ्ठा मतदान झाला फायदाअनिल गोटे यांच्या पराभवासाठी मतांचे विभाजनमहायुतीकडून हिलाल माळींना फटका१० उमेदवार निवडणूक रिंगणात