आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षण उपसंचालकांनी आदेश देवूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, तालुक्यातील मोराणे प्र.नेर येथील छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालयातील योगेश युवराज पवार व श्रीकांत मक्कन गांगुर्डे यांनी आजपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.पवार व गांगुर्डे या शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही १ जुलै १४ पासून मोराणे प्र.नेर येथील सैनिक विद्यालयात शिक्षण सेवक म्हणून नोकरीला आहोत. संस्थेने आमचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून ७ नोव्हेंबर १५ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केला.मात्र तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी वेळोवेळी त्रृट्या काढून शिक्षण सेवक प्रस्तावास मान्यता देत नव्हते. त्यामुळे आम्ही नाशिक विभागाचे उपसंचालकांकडे अपील दाखल केले. अपीलाचा निकाल आमच्या बाजुने लागला. उपसंचालकांनी पवार व गांगुर्डे यांना आठ दिवसात शिक्षण सेवक म्हणून मान्यता द्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे आदेश माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाºयांना दिले होते. याला एकवर्षाचा कालावधी लोटला. मात्र अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. शिक्षणाधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. अशामुळे आरक्षण कायदा २००४ मधील तरतुदींचा भंग केला जात आहे.शिक्षण सेवकाच्या मान्यतेचा आदेश ताबडतोब काढण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
मोरोणे प्र.नेर येथील दोन उपशिक्षकांचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:39 PM
शिक्षण सेवक प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी
ठळक मुद्देदोघ उपशिक्षक सैनिक शाळेत कार्यरततत्कालीन शिक्षणाधिकाºयांनी वेळोवेळी त्रृटी काढल्या अपीलाचा निकाल उपशिक्षकाच्या बाजुने लागलेला आहे.