देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नव्याने होणाºया पोलिसांना धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानासोबत कायद्याचे अद्यायावत ज्ञान तसेच भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, लघु कायदे, गुन्हे तपास व प्रतिबंध, पोलीस संघटन, कायदा व सुव्यवस्था, संगणक प्रशिक्षणासोबत पद व शस्त्र कवायत, शारीरिक व्यायाम, जमाव पांगविणे, कराटे, योगा, खेळ व फायरींग असे विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे़ दरम्यान, या प्रशिक्षण केंद्रात ४५५ महिलांना सध्या प्रशिक्षित केले जात आहे़ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे स्थलांतर १६ एप्रिल २०१० पासून महिंदळे शिवार येथे झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे़ ९ महिन्यांची प्रशिक्षण भरती प्रक्रिया राबविल्यानंतर शारीरिक आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नव्याने होणाºया पोलिसांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रावर पाठविण्यात येते़ पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी शासनाकडून सुमारे २१ कोटींचा निधी मिळालेला आहे़ त्याच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यात आले असून प्राचार्य, उपप्राचार्य आणि १६ अधिकाºयांसाठी निवासस्थान उभारण्याचे काम मार्गी लावले आहे़ प्रशिक्षणार्थींसाठी सुसज्ज अशी वास्तू उभारली आहे़ मुलींसाठी अत्याधुनिक असे क्लास रूम, मल्टिपर्पज हॉलदेखील उभारण्यात आलेला आहे़ याशिवाय प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात असलेले अंतर्गत रस्ते आणि आवश्यक त्या ठिकाणी बगिचा उभारला आहे़ त्यानुसार प्राप्त झालेल्या निधीचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे़ नेतृत्वासोबत आधुनिक ज्ञान आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन याठिकाणी शिकविला जातो़ व्यक्तिमत्त्वाचे धडे प्रशिक्षण केंद्रात दिले जातात़ बोलण्याची पद्धत शिकविली जाते़ मानसिकेतत बदल कसा करायचा ते शिकविले जाते़ यासोबतच प्राणायाम, योगासनाचे धडेही त्यांना दिले जातात़ भविष्यात महिला पोलीस कर्मचाºयांना आपले कर्तव्य बजावितांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार याची पुरेपुर काळजी प्रशिक्षणातून घेतली जात आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षणआजच्या आधुनिक काळातील सर्व तंत्रज्ञान नव्याने तयार होणाºया महिला पोलिसांना अवगत असावे, असा दूरदृष्टिकोन ठेवत काम सुरू आहे़ प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसविण्यात आला असून त्या माध्यमातून मुलींना शिकविले जाणार आहे़ याशिवाय पूर्वीच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे़ जुनी शिक्षणाची पद्धत कालबाह्य करण्यात आली आहे़ डिजिटल प्रणालीचे एक वेगळे वातावरण तयार करण्यात येत आहे़अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणराज्यात प्रशिक्षणाची १० केंद्र असून त्यात धुळ्याचा समावेश होतो़ या ठिकाणी विद्यार्थी दाखल झाल्यानंतर दैनंदिन प्रशिक्षणासोबतच अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते़ मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षणासोबतच ज्ञानसंपन्न करण्यासाठी भावनिक बनविण्याचा प्रयत्न येथे होत आहे़ विविध प्रकारचे ज्ञान त्यांना दिल्यानंतर सर्वगुण संपन्न असा पोलीस तयार होत असल्याचे समाधान आहे़ दोन वर्षांपासून केवळ महिलांना प्रशिक्षणगेल्या दोन वर्षापासून धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात केवळ महिला पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे़ धुळ्यातील एकमेव केंद्र आहे की ज्या ठिकाणी केवळ महिलांना ९ महिन्यांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून अत्याधुनिक धडे दिले जात आहे़
‘स्मार्ट’ पोलीस घडविण्यावर भऱ़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:00 AM