धुळे : देवपुरातील वानखेडकर नगरात ८ जून रोजी सायंकाळी भररस्त्यावर रावसाहेब पाटील आणि त्यांचा पुत्र वैभव यांचा खून करण्यात आला होता़ याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, त्यांच्या मुलासह ८ जण न्यायालयीन कोठडीत आहेत़ याप्रकरणी शासनातर्फे सरकारी वकील म्हणून अॅड़ उज्वल निकम यांची विशेष नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंग तवर यांनी दिली़याप्रकरणी संशयित बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार (गल्ली नंबर ६, धुळे), बाजीराव पवार यांचा मुलगा गौरव बाजीराव उर्फ सुभाष पवार (गल्ली नंबर ६, धुळे), जयराज पाटील, ऋषिकेश पाटील (दोनही रा़ बोरसे नगर, देवपूर, धुळे), वैभव उर्फ सोनू पवार (रा़ अभियंता नगर, देवपूर धुळे), हर्षल उर्फ दादू रविंद्र पाटील (रा़ वलवाडी, देवपूर, धुळे), भुपेश उर्फ भुपेंद्र वाल्मिक पाटील (रा़ वलवाडी, देवपूर, धुळे), भुषण बाबुराव कापकर (रा़ फुले कॉलनी, धुळे) हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत़अॅड़ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मयत रावसाहेब पाटील यांच्या परिवाराने केली होती़ त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे़
अखेर उज्वल निकम यांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:21 PM