आॅनलाइन लोकमतधुळे : फेब्रुवारी महिन्यात जम्मु-काश्मिरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्टÑातील दोन जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या कुटुंबियांना येथील युवक शिवजयंती उत्सव समिती साक्रीरोड, डीजे गणराया व साक्रीरोड परिसरातील नागरिकांनी जमा केलेली ५० हजाराची मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द करण्यात आली.पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात ४२ जवान शहीद झाले होते. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत (रा. मलकापूर) व नितीन राठोड (रा. लोणार, गाव विरपांगरा) यांचा समावेश होता.साक्री रोडवर असलेल्या युवक शिवजयंती उत्सव समिती व गणराया डीजे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करीत ५० हजार रूपयांची रक्कम जमविली. शहीद जवान संजय राजपूत यांच्या मातोश्री जिजाबाई राजपूत यांच्याकडे व शहीद जवान नितीन राठोड यांच्या मातोश्री यांच्याकडे प्रत्येकी २५ हजार रूपयांप्रमाणे रक्कम सुपुर्द केली.यावेळी विकास गोमसाळे, शंकर खैरनार, गोपाळ गोमसाळे, मोहित कांबळे यांचे सहकार्य लाभले.तसेच मदतनिधी जमा करण्यासाठी दीपक कोळी, रणजित बच्छाव, गुड्डु कुळकर्णी, उदय चौधरी, बंटी पाटील, सचिन गांगुर्डे, कुश मराठे, सौरभ बागूल, मिहिर खैरनार, प्रणव पाटील, कुणाल सोनवणे, रत्ना सोनवणे, डी. राजपूत, यश पुराणिक, सई उपकारे, हर्षल सुतार कुलदीप सोनवणे, लकी सोनवणे, रणवीरसिंह राजपूत, योगेश भोकरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:39 AM
धुळे येथील युवक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहीदांच्या घरी दिली भेट
ठळक मुद्देपुलवामा येथील हल्ल्यात महाराष्टÑातील दोन जवान शहीद झाले होतेशहीद कुटुंबियांसांठी जमविली आर्थिक मदत