धुळे : येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. धुळ व खड्यांमुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी मार्ग काढण्यात यावा असे पत्र आमदार डॉ. फारूख शहा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांना दिले आहे. तर बसस्थाकाच्या परिसरात डांबरीकरण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही पत्राव्दारे केली आहे़गुलमोहर विश्रामगृहात आमदार शाह यांनी सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शाह म्हणाले की, २१ डिसेंबर रोजी धुळे बस स्थानकाच्या आवारात भेट दिली होती़ यावेळी स्थानकाचे आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे व धुळीचे प्रमाण आढळुन आले. त्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड त्रास होत असतो. याबाबत अधिकाºयांनी सांगितले की, तीन वर्षांपासून पासुन बस स्थानकाचे डांबरीकरण झालेले नाही. डांबरीकरण करण्याच्या तीन वेळा निविदा काढुनही ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही़तसेच २ कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने डांबरीकरण होऊ शकत नाही़ त्यासाठी ५८ लाखांचा डांबरीकरणाचा प्रस्ताव विभाग नियंत्रकांनी नाशिक प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविला आहे़ दरम्यान जिल्हाधिकारी डीग़ंगाथरन यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विभाग नियंत्रकांनी केली आहे़
बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी मार्ग काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 10:55 PM