शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 8:25 PM

आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिंदखेडा (जि.धुळे) : तालुक्यातील वर्षी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास औषधी दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील औषधी साहित्य जळून खाक झाले. सव्वातासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्यात आलेली नव्हती.

वर्षी येथील रवींद्र जैन हे सकाळी ११ च्या सुमारास औषधी दुकानात असताना त्यांना अचानक जळाल्याचा वास येऊ लागला. बाहेर कोणीतरी काही तरी कचरा जाळला असेल असे त्यांना सुरुवातीला वाटले. मात्र, जळाल्याचा वास जास्त येत असल्याने ते वरच्या मजल्यावर गेले असता तेथे त्यांना आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ, तसेच त्यांचे भाऊ दिलीप जैन हे धावत आले. त्यांनी लगेच घराजवळ असलेला ट्यूबवेल सुरू करून आगीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्याने ती वाढतच गेली.

गावातील नागरिकांनी शिरपूर पालिकेला फोन करून आगीची कल्पना दिली. पाऊणतासात अग्निशमन बंब दाखल झाला. त्यानंतर शिंदखेडा येथूनही पाण्याचा बंब आला. दोन्ही बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी वर्षीचे डी. आर. पाटील, सरपंच सुरेश माळी आदी उपस्थित होते. आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.झोपडीला आग-गावातील गंगूबाई भाईदास भिल यांच्या झोपडीला सोमवारी मध्यरात्री आग लागली. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीची नोंद करण्यात आली नाही. 

 

टॅग्स :fireआगDhuleधुळेMedicalवैद्यकीय