धुळे : शहरातील 80 फुटी रोडवर असलेल्या रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण अग्नितांडवाची घटना घडली़ या घटनेत सहा ते सात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े मात्र घरे आगीच्या भक्षस्थानी पडत असताना मनपा अग्निशमन विभागाची ‘साखरझोप’ न उघडल्याने नागरिकांना अग्निशमन बंब स्वत: चालवून घटनास्थळी न्यावा लागला़ या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ घटनेची पोलिसात नोंद झाली आह़ेपहाटे 3 वाजता आगशहरातील 80 फुटी रस्त्यावरील नटराज चित्र मंदिरासमोर रमजानबाबानगर आह़े बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सर्व गाढ झोपेत असताना शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागली़ मुस्लीमबहुल वस्तीतील सदरचा परिसर दाट वस्तीचा असून सर्वाधिक घरे ही कच्चे बांधकाम, लाकडी व पत्र्याची आहेत़ त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल़े आजूबाजूला राहणा:या काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून तसेच आग लागलेल्या घरांचे दरवाजा ठोकून संबंधित नागरिकांना जागे केले काही नागरिकांनी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरांमधील सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले, तसेच मिळेल त्या वस्तूने पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र आग आटोक्यात न येता वाढतच होती़ बघता बघता सहा ते सात घरांना आगीने वेढल़े अग्निशमन दल ‘साखरझोपेत’अनेकदा अग्निशमन विभागाशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितल़े त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरळ पांझरा जलकेंद्राच्या मागे असलेल्या अग्निशमन विभागाकडे धाव घेतली़ या ठिकाणी केवळ एक कर्मचारी झोपला होता़ याठिकाणी चालक नसल्याचे त्याने सांगितल़े त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या बंबांमध्ये पाणीदेखील नव्हत़े बंब गळत असल्याने पाणी भरून ठेवता येत नसल्याचे कर्मचा:याने सांगितल़े त्यामुळे या ठिकाणी उभ्या असलेल्या एका बंबाला चावी असल्याच पाहून तेथे आलेल्या नागरिकांपैकी फिरोज आसिफ शहा या नागरिकाने अखेर ‘ड्रायव्हर’ची भूमिका बजावत बंब काढून तो सरळ घटनास्थळी नेला़ अखेर आगीवर नियंत्रणसदरचा बंब नागरिकांनी नेल्यानंतर अग्निशमन विभागाचे अन्य बंबदेखील घटनास्थळी दाखल झाल़े सुमारे दीड ते दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल़े माजी उपमहापौर फारूख शाह, काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केल़े घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी दाखल झाले होत़े या घटनेत फिरोजाबी बिस्मिल्ला शहा, गनीशहा बिस्मिल्ला शहा, मुनाफ लतीफ शेख, भिकारी शहा बिस्मिल्ला शहा, साबीर शेख रमजान शेख यांच्या घराला आग लागल्याने दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल़े सदर कुटुंबांपैकी भिकारी शहा यांच्या मुलाचे लग्न 20 ते 25 दिवसांवर आल्याने धान्य, कपडे, रोख रक्कम जळून खाक झाल़े या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक विभागाचे महानगराध्यक्ष युसूब पिंजारी यांनी नुकसान भरपाईसह अगिAशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांवर कारवाईची मागणी केली़आग लागल्याची माहिती मिळताच तीन बंब पाठविले होते. कर्मचारी या बंबांसोबत गेल्यामुळे कार्यालयात कर्मचारी नव्हत़े शिवाय आपण स्वत: सुटीवर असलेल्या दोन कर्मचा:यांना बोलावून घेत कार्यालयात पोहचत होतो. तसे संबंधित नागरिकांना फोनवर सांगितल़े मात्र विभागात असलेला एक बंब नागरिक घेऊन गेल़े -तुषार ढाके, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा, धुळे
अग्नितांडवामुळे नुकसान!
By admin | Published: February 02, 2017 12:50 AM