लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अवधान एमआयडीसी येथील भांडे तयार करुन पॉलिश करुन देणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागली़ यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले़दरम्यान, फॅक्टरीचे मालक बाहेरगावी असल्यामुळे नेमके काय जळाले आणि कितीचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकलेली नाही़मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान एमआयडीसी येथील सेक्टर डीमधील जैन यांचे भांडी तयार करुन त्यांना पॉलीश करुन देणारी फॅक्टरी आहे़ यातील गोडावूनला अचानकपणे आग लागली. या आगीत भांड्यांना पॉलीश करुन देण्याची सामुग्री जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़या आगीत लाकडी कॅबीनसह त्यात ठेवलेले कागदपत्रे, अन्य साहित्य जळून खाक झाले आहेत़ आगीची माहिती अग्नीशमन विभागाला कळताच तीन बंबाच्या मदतीने तुषार ढाके, राजन महाले, अतूल पाटील यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ सुदैवावाने जिवीतहानी झाली नाही.दरम्यान, मोहाडी पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे़
धुळे एमआयडीसीत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 9:46 PM