लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ऊस गल्लीत असलेल्या जुन्या काळातील घराला शुक्रवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली़. लाकडाचे घर असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते़ घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे ३ बंब दाखल झाले़ वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही आल्याने त्यांनी विद्युत पुरवठा बंद करत आग आटोक्यात आणली़ यात मात्र लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़शहरातील खोल गल्ली भागात ऊस गल्लीचा परिसर आहे़ या ठिकाणी मुन्ना मिठवाले यांचे गणेश ट्रेडर्स दुकान आहे़ याला लागूनच दोन मजली जुन्या काळातील घर आहे़, या घरात सध्या कोणीही वास्तव्यास नाही़ केवळ काही मिठाच्या गोण्या व जुने साहित्य थोड्याफार प्रमाणात आहे़ गुरुवारी सायंकाळी उशिरा पावसाने सुरुवात झाल्यानंतर पावसाने जोर पकडला होता़ अशातच विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर पहाटे विद्युत पुरवठा सुरू होताच शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आग लागली़ पहाटे लागलेल्या आगीत लाकडाचे घर जळून खाक झाले़ लोकांनीही मदतीसाठी धाव घेतली़ अग्निशमन बंब तातडीने दाखल झाले होते़, पण शॉर्ट सर्किटमुळे आग विझविताना खूप अडचणी आल्या़ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, त्यानंतर आग आटोक्यात आली़ पोलिसांचा बंदोबस्त या वेळी होता़ घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू झाले आहे़
ऊस गल्लीतील घराला आग, लाखोंचे नुकसान
By admin | Published: July 14, 2017 11:47 PM