शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अग्निशमन बंबांवर पाणीवाटपाची वेळ!

By admin | Published: May 29, 2017 1:05 AM

महापालिका : टँकर खरेदी होईना, आग विझविण्यासाठी केवळ दोन बंबांवरच भिस्त

धुळे : महापालिकेची टँकर खरेदी रखडल्याने अग्निशमन विभागाच्या बंबांवर लग्नकार्यात पाणीवाटपाची वेळ आली असून, आग विझविण्याची पूर्ण वेळ जबाबदारी केवळ दोन बंब पार पाडत असल्याचे समोर आले आह़े त्यामुळे टँकर खरेदी कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला आह़ेमनपा मालकीच्या एकमेव टँकरचा केवळ सांगाडाच उरल्याने त्यात भरलेले 80 टक्के पाणी गळून जात होत़े त्यामुळे गेल्या वर्षाच्या सुरुवातीस झालेल्या महासभेत गळक्या टँकरच्या विषयावरून प्रशासनाला जाब विचारून नवीन टँकर घेण्याची मागणी करण्यात आली होती़ त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या सभेत टँकर, कचरा उचलणारे वाहन व जेसीबी खरेदीचा ठरावही करण्यात आला़ मात्र आतार्पयत खरेदी होऊ शकलेली नाही़ मनपा अग्निशमन विभागात एकूण पाच बंब असून त्यापैकी दोन बंब आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी सज्ज असतात़ तर दोन बंब दहा वर्षापूर्वीचे असून ते पाणीवाटपासाठी देण्यात आले आहेत़ उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने नागरिकांना या बंबांद्वारे पाणी पुरविले जाते. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे विविध कार्यक्रमांमध्येदेखील पाणी पुरविण्याची जबाबदारी अग्निशमन दलाच्या बंबांना पार पाडावी लागत आह़े त्याचप्रमाणे शहरातील विविध पाणपोई, महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, उद्यानांनाही हे बंब पाणी पुरवित असतात़ मनपाच्या पांझरा जलकेंद्रातून एक टँकर (बंब) पाण्यासाठी 500 रुपये आकारणी केली जाते, तर नगरसेवकांनी मागणी केल्यास त्यांच्या नावावर पाणी नेल्याची नोंद केली जाते व निवडणुकीपूर्वी तो खर्च वसूल केला जातो़ मात्र अनेकांकडून दादागिरी करून टँकर भरून नेले जात असून खासगी टँकरही सहजपणे पांझरा जलकेंद्रातून भरून नेले जातात. तसेच त्यांची नोंदही ठेवली जात नाही़ त्यामुळे नियमांचे पालन होणे आवश्यक आह़े अन्य एका बंबाचा गेल्या महिन्यात अपघात झाल्यामुळे तो तात्पुरत्या वापरासाठी ठेवण्यात आला आह़े त्याचप्रमाणे आताच नव्याने एका चेसिसची खरेदी करण्यात आली असून बंब तयार केला जाणार आह़े परंतु त्यासाठी कालावधी लागेल़ याव्यतिरिक्त एक लहान जीपही अग्निशमन विभागात आह़े परंतु किरकोळ दुरुस्त्यांमुळे वर्षभरापासून ही जीप धूळखात पडून आह़े शहरात अरुंद गल्लीबोळांमध्ये आग लागल्यास जीपचा वापर होऊ शकतो. परंतु त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आह़े अग्निशमन विभागात सध्या 35 कर्मचारी असून रिक्त पदे भरणे आवश्यक आह़े